‘संविधानाने दिलेला हक्क पहिले नंतर लग्न’, नवरदेवानेही बजावला मतदानाचा हक्क

यवतमाळ – राज्यात नगरपंचायती च्या सार्वत्रिक निवडणुकी करिता मतदान पार पडत आहे. यवतमाळ जिल्ह्यातही आज सहा नगर पंचायतींसाठी मतदान पार पडत आहे. आज लग्नाची तारीख असल्याने लग्नमंडपात जाण्याआधी मतदान केंद्रावर जाऊन नवरदेव नवरी मतदान करत असल्याचे अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहे. कळंब मध्येही नवरदेवाने आधी मतदानाचा हक्क पार पाडून नंतर लग्नासाठी पुढे गेल्याचे दिसून आले.

कळंब येथील डॉ. चेतन वाघ यांनी बोहल्यावर चढायच्या आधी पहिल्यांदा आपला राष्ट्रीय हक्क बजावला आणि नंतरच ते लग्नासाठी अमरावती कडे मार्गस्थ झाले. संविधानाने दिलेला हक्क पहिले आणि नंतर लग्न असं त्यांनी सांगितले. गावच्या विकासासाठी मतदान आपले कर्तव्य आहे आणि ते आधी निभवायचे यासाठी उर्दू शाळा मतदान केंद्रावर नवरदेवाने मतदानाचा हक्क बजावला. दरम्यान, राज्यात कडाक्याची थंडी आहे. त्यामुळे सकाळी नागरिकांचा मदतानाचा उत्साह कमी दिसत होता. मात्र दुपार नंतर मतदान केंद्रावर नागरिकांच्या रांगा पाहायला मिळाल्या. 100हून अधिक वय असलेल्या आजी-आजोबांनीही मतदानाचा हक्क बजावून तरूणांचा उत्साह वाढविला.