पुणे जिल्हा | अण्यात हळदी-कुंकू समारंभ उत्साहात

बेल्हे, (वार्ताहर) – अणे (ता. जुन्नर) ग्रामपंचायतीच्या वतीने हळदी-कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या हळदीकुंकू समारंभासाठी श्री रंगदास स्वामी शिक्षण विकास मंडळाच्या उपाध्यक्ष भारती बोरा तसेच मंगरूळ गावच्या सरपंच तारा लामखडे, पेमदरा गावच्या सरपंच जयश्री गाडेकर, पारगाव गावच्या सरपंच रेश्मा बोटकर, सामाजिक कार्यकर्त्या कविता पवार या उपस्थित होत्या.

त्याचबरोबर गावातील जवळपास 400 पेक्षा अधिक महिला या समारंभाप्रसंगी उपस्थित होत्या. हळदीकुंकू समारंभ निमित्ताने खेळ पैठणीचा कार्यक्रमही रंगला होता, अशी माहिती अणे गावच्या सरपंच प्रियंका दाते यांनी दिली.