पिंपरी | प्रा.रामकृष्ण मोरे महाविद्यालयाला उत्कृष्ट महाविद्यालयाचा पुरस्कार

पिंपरी (प्रतिनिधी) – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा शैक्षणिक वर्ष 2021-22 राष्ट्रीय सेवा योजनेचा विद्यापीठस्तरीय उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार आकुर्डी येथील प्रा. रामकृष्ण मोरे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाला जाहिर झाला. तर उत्कृष्ट कार्यक्रम अधिकारी म्हणून डॉ सारिका मोहोळ यांना जाहीर झाला आहे.

महविद्यालयात रक्तदान शिबिरे, प्लास्टिक संकलन, महिला सबलीकरण ,व्यक्तिमत्त्व विकास, पर्यावरण संवर्धन, मतदान जनजागृती, रस्ता सुरक्षा अभियान, आर्थिक साक्षरता यासारख्या उपक्रमामधून विद्यार्थ्यांच्या कला गुणांना चालना दिली जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या स्तरावरील शिबिरामध्ये सहभागी घेण्याची संधी मिळाली जाते.

जिल्हा समन्वयक डॉ. सारिका मोहोळ या पुणे ते पंढरपूर पायी वारी राज्यस्तरीय शिबीर, कोईमतूर व कर्नाटक येथील राष्ट्रीय एकात्मता शिबीर, मनाली हाटकोटी येथील राष्ट्रीय साहसी क्रीडा शिबीर,पूर्व प्रजासत्ताक दिन संचलन शिबीर यासारख्या विद्यापीठ, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील विविध शिबिरामध्ये संघनायक तसेच विविध विद्यापीठस्तरावरील समिती सदस्य म्हणून सक्रिय सहभागी असतात डॉ. सारिका मोहोळ यांना उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल शैक्षणिक वर्ष 2021- 22 मधील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा उत्कृष्ट कार्यक्रम अधिकारी पुरस्कार जाहीर झाला आहे.

संस्थेचे अध्यक्ष अजित पवार, उपाध्यक्ष राजेंद्र घाडगे, मानद सचिव ॲड. संदीप कदम, खजिनदार ॲड. मोहन देशमुख, उपसचिव एलएम पवार, सहाय्यक सहसचिव एएम जाधव, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बीजी.लोबो, उपप्राचार्य डॉ. एचबी सोनावणे, प्रबंधक संजय झेंडे ,शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि सर्व स्वयंसेवकांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.