भारती विद्यापीठच्या विद्यार्थ्याने तयार केला “रॉंग टर्न’

संगणक “गेम’ तयार करण्यात मिळाले यश; “गुगल’वरही उपलब्ध 

– संतोष कचरे 

आंबेगाव बुद्रुक –  भारत आणि चीन देशाच्या वाढत्या तणावाच्या पार्श्‍वभूमीवर चिनच्या अनेक ऍप्स्‌ तसेच गेम्स्‌वर बंदी घालण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी होकल फॉर लोकलनुसार संगणक अभियंत्यांना याकामी नवनिर्मितीचे आवाहन केले होते. यानुसार भारती विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालयात संगणक विभागात चतुर्थ वर्षात शिकणाऱ्या राम भोंगळे या एका ग्रामीण विभागातील विद्यार्थ्याने “रॉंग टर्न’ नावाच्या आकर्षक मोबाइल गेम (अँड्रॉइड) निर्मिती करण्यात यश मिळवले आहे. विशेष, म्हणजे कन्सोल व गुगल प्ले स्टोअरवर ही उपलब्ध झाली आहे.

भारती विद्यापीठ शैक्षणिक संस्थने नेहमीच विद्यार्थ्यांतील गुण हेरण्याचा प्रयत्न केला आहे. अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांचे शिक्षण पारंपरिक पद्धतीने व विद्यापीठाने नेमून दिलेल्या अभ्यासक्रमाप्रमाणे होत असतान. या सर्व शिक्षणाचा उपयोग फक्‍त चांगली नोकरी कशी मिळेल यासाठी न करता थोड्या कल्पकतेने वेगवेगळ्या पद्धतीने कसा करता येईल, याचा विचार प्रत्येक अभियांत्रिकीचा विद्यार्थी करीत असतो, अशा विचारातूनच चीन सारख्या देशापेक्षा सरस गेम्स्‌ तयार करण्याचा विचार राम भोंगळे याने केला, यात त्याला यशही आले आहे.

मोबाइल गेमचे आकर्षण राम याला लहानपणापासूनच होते. या आवडीतूनच त्याने आपण ही अशा प्रकारचा गेम तयार करण्याचा ध्यास मनात घेतला होता. त्यातच सध्याची संगणक क्षेत्रातील स्थिती यास कारणीभूत ठरली. ही गेम तयार करण्यासाठी राम याने विशेष प्रोग्रामिंग भाषेचा तसेच मॉडेलिंगसाठी खास सॉफ्टवअरचा उपयोग केला.

गेम तयार करण्यासाठी केला. यासाठी त्याला संगणक विभागातील प्राध्यापकांनी मोलाचे मार्गदर्शन करीत वेळोवेळी प्रोत्साहित केले. ही गेम सध्या कन्सोल व गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे. गेमच्या आकर्षक रचनेमुळे व उत्कृष्ठ ग्राफिक्‍समुळे अल्पावधीतच शेकडो लोकांनी ही गेम खेळली असून त्याला अनेकांनी 5 स्टार रेटिंग दिले आहे.

Leave a Comment