पुणे : भवानी पेठ पोलीस लाईन मंडळाचा”ज्ञानाचा प्रसाद वाटप’ कार्यक्रम

पुणे- “अखिल भवानी पेठ पोलीस लाईन श्री गणेश तरुण मंडळाने एक अनोखा उपक्रम वापरला आहे. “ज्ञानाचा प्रसाद वाटप’ असा हा उपक्रम आहे. यामध्ये लहान मुलांना चित्रकला व थोर व्यक्तींच्या पुस्तकांचे वाटप करण्यात आले.

मंडळाने दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षीदेखील मंडळाच्या वतीने गणपती मुर्तीची स्थापना करण्यात आली. मंडळाचे यंदा 69 वे वर्ष असुन मंडळाच्या वतीने दरवर्षी अनेक सामाजिक उपक्रम राबविले जातात. परंतु सध्या कारोना महामारीच्या अनुषंगाने सामाजिक कार्यक्रम घेण्यात आले नाहीत. तरी देखील त्यातून एक आगळी वेगळी संकल्पना लक्षात घेऊन एक कार्यक्रम करण्यात आला.

गेली 70 वर्ष मंडळाला सहकार्य करण्यात येत असलेले वसाहतीमधील कर्मचारी व कुटुंबिय यांचा तसेच सफाई कर्मचारी यांचा देखील मंडळाच्या वतीने घरोघरी जाऊन शाल, श्री फळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. सध्याचे युग हे मोबाईलचे युग असल्याने
जन्म झाल्यापासून जसे लहान बाळाला कळते तेव्हापासून त्यास मोबाईलचे वेड लागते.

त्यातून लक्ष वेधण्याकरीता मंडळातर्फे 17 सप्टेंब रोजी गणपतीची आरती झाल्यानंतर “ज्ञानाचा प्रसाद वाटप ” हा कार्यक्रम राबविण्यात आला. त्या कार्यक्रमात वसाहतीमधील लहान मुला मुलींना चित्रकलेची पुस्तके, थोर नेत्यांची पुस्तके वाटप करण्यात आली. त्या संकल्पनेतून मोवाईलकडून पुस्तकाकडे असे लक्ष वेधण्यात आले.

लहान मुलांच्या चेहऱ्यावर एक वेगळ्या प्रकारचा आनंद दिसु लागला. वरिल कार्यक्रम मंडळाचे आधारस्तंभ प्रशांत शिंदे, दत्तात्रय मामा नरळे यांच्या मार्गदर्शनातून मंगेश रोकडे, सुमित खुट्टे, राहुल धोत्रे व कामरान शेख आणि मंडळाचे इतर कार्यकर्ते यांनी राबविला.