मोठी बातमी : चंद्रकांत पाटलांवर पुन्हा शाईफेक करण्याचा प्रयत्न ! सोलापुरात भीम आर्मीच्या पदाधिकाऱ्यांची भाजपविरोधात घोषणाबाजी

सोलापूर – सोलापुरच्या पालकमंत्री पदाचा भार स्वीकारल्यानंतर चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) हे पहिल्यांदाच सोलापूर (Solapur) दौऱ्यावर आले होते. त्यावेळी भीम आर्मीच्या (BhimArmy) कार्यकर्त्याने शाईफेक करण्याचा प्रयत्न केला. तर या पदाधिकाऱ्याने काळे झेंडे दाखवत घोषणाबाजी देखील केली. यावेळी या पदाधिकाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. सरकारी नोकऱ्यांमधील कंत्राटीकरण रद्द करण्याची मागणी या पदाधिकाऱ्याने केली असल्याचे सांगण्यात येत आहे.

चंद्रकांत पाटील हे पुढील दोन दिवस सोलापूर जिल्ह्याच्या (Solapur police) दौऱ्यावर आहेत. दरम्यान शासकीय विश्रामगृहामध्ये दाखल झाल्यानंतर त्यांच्यावर हा शाईफेकीचा प्रयत्न करण्यात आला. तर यावेळी कंत्राटी भरती विरोधात या पदाधिकाऱ्याने घोषणाबाजी देखील केली. तर काळे झेंडे दाखवण्याचा देखील प्रयत्न केला. (Chandrakant Patil shaifek)

चंद्रकांत पाटील येणार म्हणून याठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला होता. पण त्यामधून या पदाधिकाऱ्याने पुढे जात शाईफेक करण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान, याआधी पुण्यातही मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करण्यात आली होती. महापुरुषांबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.