मोठी बातमी ! माजी केंद्रीय मंत्री माणिकराव गावित यांचे निधन

नाशिक : तब्बल आठ वेळा खासदार म्हणून संसदेत निवडून आलेले लोकप्रिय नेते आणि माजी मंत्री माणिकराव गावित यांचे निधन झाले असल्याची माहिती समोर येत आहे. गावित यांच्यावर नाशिकमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांची प्रकृती बिघडल्यानं रुग्णालयात दाखल कऱण्यात आले होते. आज सकाळी ८ वाजता त्यांची प्राणज्योत मालवल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.

माणिकराव गावित यांच्या पार्थिवावर नवापूर इथे उद्या अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.माणिकराव गावित हे ८ वेळा खासदार झाले होते. दांडगा जनसंपर्क असणाऱ्या माणिकराव गावित यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात ग्रामपंचायतीपासून केली होती.

१९६५ ला ग्रामपंचायतीपासून सुरुवात करणाऱ्या गावित यांनी १९८१ मध्ये पहिल्यांदा खासदारकी लढवत लोकसभेत एन्ट्री केली होती. त्यानंतर माणिकराव गावित यांनी केंद्रीय गृहराज्यमंत्रीपदही भूषवलं होतं. याशिवाय लोकसभेचे हंगामी अध्यक्षही होते. त्यांच्या निधनावर राजकीय स्तरावून श्रद्धांजली वाहण्यात आली आहे.त्यांची मुलगी निर्मला गावित इगतपुरीच्या माजी आमदार ,तर मुलगा भरत गावित भाजपाचे जिल्हा परिषद सदस्य आहेत.