मोठी बातमी : फेक एन्काऊंटर प्रकरणात प्रदीप शर्मांना जन्मठेप, पुढील तीन आठवड्यात…

Pradip Sharma Life Imprisonment – एन्काऊंटर स्पेशालिस्ट अशी ओळख असलेले प्रदीप शर्मा यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. २००६ मधील लखनभैय्या नकली एन्काऊंटर प्रकरणात त्यांना ही शिक्षा सुनावण्यात आली आहे.

यासोबतच, नोव्हेंबर 2006 मध्ये लखनभैया बनावट चकमक प्रकरणातील 12 आरोपींना ट्रायल कोर्टाने सुनावलेली शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाने कायम ठेवली आहे. ट्रायल कोर्टाने 13 आरोपींना दोषी ठरवताना प्रदीप शर्मा यांची निर्दोष मुक्तता केली होती. मात्र हायकोर्टाने प्रदीप शर्मा यांची निर्दोष सुटका रद्द करत त्यांना देखील दोषी ठरवले आहे.

एकूण 13 आरोपींना हायकोर्टाने दोषी ठरवले आहे. माजी एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना तीन आठवड्यांत शरण येण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

काय आहे लखनभैय्या एन्काऊंटर प्रकरण? | Pradip Sharma Life Imprisonment

राम नारायण गुप्ता उर्फ लखन भय्या हा गँगस्टर अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनचा जवळचा हस्तक होता. मुंबईत तो छोटा राजनसाठी काम करत होता. प्रदीप शर्मा आणि त्यांच्या पथकाकडून लखन भय्याला वाशी या ठिकाणाहून उचलण्यात आलं. त्यावेळी त्याच्याबरोबर अनिल भेडा हा व्यक्ती होता.

याच दिवशी संध्याकाळी मुंबईतल्या वर्सोवा या ठिकाणी असलेल्या नाना-नानी पार्कमध्ये लखन भय्याचं एन्काऊंटर करण्यात आलं. २००६ मध्ये ही घटना घडली होती. आता या प्रकरणात प्रदीप शर्मांना जन्मठेप सुनावण्यात आली आहे.

‘ते’ पोलीस कर्मचारी कोण?

प्रदीप शर्मा यांना दोषी ठरवण्यात आले असून यापूर्वी दोषी ठरवण्यात आलेल्या १२ अन्य पोलीस कर्मचाऱ्यांना देखील जन्मठेपेची शिक्षा देण्यात आली आहे.

पोलीस निरीक्षक

प्रदीप सूर्यवंशी (लखन भैयाला दोनदा गोळी मारली)

सहायक पोलिस निरीक्षक

नितीन सरताप
दिलीप पालांडे

पोलीस उपनिरीक्षक

गणेश हरपुडे
आनंद पाताडे

पोलीस

रत्नाकर कांबळे,
तानाजी देसाई (त्याने एक गोळी झाडली)
हलकी पायरी
पांडुरंग कोकम
संदीप सरदार
देविदास सकपाळ
विनायक शिंदे