सरकारकडून करोनानिर्बंधांबाबत सुधारीत आदेश; ब्युटी पार्लर, जिम सुरूच राहणार

मुंबई – राज्यातील ब्युटीपार्लर आणि जीमला बंद टेवण्याच्या नियमातून रविवारी सूट देण्यात देण्यात आली. 50 टक्के उपस्थितीत हे च्यवसाय सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आल्याचे सुधारीत आदेशात नमूद केले आहे.

करोना वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारकडून शनिवारी जारी करण्यात आलेल्या निर्बंधाच्या नियमावलीत रविवारी दोन बदल करण्यात आले. नव्या निर्बंधांची अंमलबजावणी रविवारी मध्यरात्रीपासून होणार आहे. व्यावसायिकांच्या दबावामुळे राज्य सरकारला दोन नियमांमध्ये बदल करावा लागला आहे. यापूर्वी ठाकरे सरकारने जारी केलेल्या नियमावलीनुसार सोमवारपासून राज्यात व्यायामशाळा आणि ब्युटी पार्लर्स पूर्णपणे बंद असणार होती. तर सलून्स 50 टक्के क्षमतेने सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली होती.

राज्य सरकारच्या या निर्णयावर जिम मालक आणि ब्युटी पार्लर्स चालवणाऱ्या व्यावसायिकांनी टीकेची झोड उठवली होती. त्यामुळे रविवारी या नियमात बदल करण्यात आला. त्यानुसार आता जिम आणि ब्युटी पार्लर्स 50 टक्के क्षमतेने सुरु ठेवता येतील. मात्र, याठिकाणच्या कर्मचारी आणि ग्राहकांनाही करोना लशीचे दोन्ही डोस घेतलेले असणे बंधनकारक आहे. सरकारच्या या निर्णयामुळे ब्युटी पार्लर्स आणि जिम चालकांना मोठा दिलासा मिळणार आहे.