Bigg Boss Marathi 5 | ‘या’ कारणामुळे महेश मांजरेकर बिग बॉस मधून पडले बाहेर; स्वतःच केला खुलासा, पाहा….

Bigg Boss Marathi 5 | Riteish Deshmukh । Mahesh Manjrekar : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय शो ‘बिग बॉस मराठी 5′ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. मागील काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या या शोची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. अखेर काही दिवसांपूर्वीच बिग बॉस मराठी 5’ संदर्भात मोठी घोषणा झाली असून, कलर्स मराठीकडून या शोचा प्रोमो शेअर करण्यात आला आहे.

आतापर्यंत या शोचे चार सीझन झाले असून या कार्यक्रमाचं होस्टिंग ‘महेश मांजरेकर’ करते होते. मात्र आता पाचव्या पर्वात प्रसिद्ध अभिनेता हा शो होस्ट करणार आहे. कलर्स मराठीच्या इन्स्टाग्राम पेजवर ‘बिग बॉस मराठी 5’ चा नवा प्रोमो शेअर करण्यात आलेला आहे.

शेअर करण्यात आलेल्या प्रोमोमध्ये, महेश मांजरेकरांच्या ऐवजी आता प्रसिद्ध मराठमोळा अभिनेता रितेश देशमुख ‘बिग बॉस मराठी’चा नवा होस्ट असणार आहे. “मराठी मनोरंजनाचा “BIGG BOSS” सर्वांना “वेड” लावायला येतोय… “लयभारी”होस्ट, सुपरस्टार रितेश देशमुख !” असं कॅप्शन देत हा नवा प्रोमो शेअर करण्यात आलेला आहे.

या नव्या सिझनद्वारे प्रेक्षकांना मोठे सरप्राईज मिळाले आहे. त्यामुळे बिग बॉस मराठीचा हा नवा प्रोमो पाहून रितेशचे चाहते देखील आनंदी झाले आहेत. तर दुसरीकडे गेले चार वर्ष हा होस्टकरून प्रेक्षकांची तुफान मने जिंकणारे महेश मांजरेकर यंदाच्या सिजनमध्ये नसल्याने प्रेक्षक काहीसे नाराज झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

पण नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत महेश मांजरेकर यांनी शोमधून बाहेर पडण्यामागचं कारण सांगितलं. ते म्हणाले, “मी सध्या मणिरत्नम यांच्या चित्रपटात व्यस्त आहे. याशिवाय एका कन्नड चित्रपटाचंही काम सुरू आहे. शूटिंगसाठी मला सतत दिल्ली, लंडन, बँकॉक याठिकाणी जावं लागतंय.

पुढील दोन ते तीन महिने मी या प्रोजेक्ट्समध्ये व्यग्र असणार आहे. माझ्या मनातही काही कल्पना आहेत. त्यामुळे हे शूटिंग संपल्यानंतर त्यावर मी काम करणार आहे. म्हणूनच मी सध्या बिग बॉससाठी वेळ देऊ शकलो नाही”, असं मांजरेकरांनी स्पष्ट केलं.