बिग बॉस OTT सीझन 3चा प्रोमो समोर; अनिल कपूर यांची ‘झकास’ एन्ट्री

Bigg Boss OTT 3| मागील काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या बिग बॉस OTT च्या सीझन 3 चा प्रोमो रिलीज झाला आहे. यंदाचा हा शो खास असणार आहे. यात अभिनेता अनिल कपूर होस्टच्या भूमिकेत दिसणार असल्याचे आहे. नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमधून हे काहीसे स्पष्ट होत आहे. या प्रोमोमध्ये होस्टची झलक दाखवण्यात आली आहे.

यात निर्मात्यांनी होस्टची ओळख लपवून ठेवली आहे. पण होस्टच्या आवाजावरून हे स्पष्ट होते की अनिल कपूर बिग बॉस ओटीटीचा तिसरा सीझन होस्ट करत आहे. बरेच दिवसांपासून अनिल कपूर यांचे नाव चर्चेत होते. आता प्रोमो समोर आल्यानंतर, बिग बॉस ओटीटी 3 च्या होस्ट म्हणून त्याने सलमान खानची जागा घेतली असल्याचे स्पष्ट होत आहे. या प्रोमोमध्ये अनिल कपूर खूप झाले, आता तो काहीतरी खास करणार असल्याचे म्हणतात. बिग बॉस OTT 3 चा हा प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by JioCinema (@officialjiocinema)

जिओ सिनेमाने बिग बॉस OTT 3 जूनमध्ये येणार असल्याची घोषणा करणारा व्हिडिओ प्रोमो जारी केला आहे. दरम्यान, हिंदीमध्येही सलमान खानने बिग बॉसचे सर्व सीझन होस्ट केले आहेत. तर बिग बॉस ओटीटीचा एक सीजन करण जोहरने होस्ट केला आणि दुसरा सीझन सलमान खान होस्ट करत होता. आता ‘बिग बॉस ओटीटी सीझन 3′ येणार असून अनिल कपूर होस्ट  करताना दिसणार आहे

बिग बॉस OTT सीझन 3 या जूनमध्ये Jio सिनेमा प्रीमियमवर येणार आहे.’बिग बॉस ओटीटी सीझन 3’ जून 2024 मध्ये कोणत्या तारखेला रिलीज होऊ शकतो. हे अद्याप स्पष्ट केलेले नाही. मात्र चाहते देखील या नव्या शोसाठी उत्सुक आहेत.

हेही वाचा : 

रवी किशन गोरखपूर मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी पोहोचले