पुणे | दुचाकीस्वार चोरट्यांनी मोबाईल हिसकावला

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – माजी क्रिकेटपटू केदार भावे यांचा मोबाईल दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावून नेल्याची घटना सारसबाग परिसरात घडली. याप्रकरणी केदार श्रीराम भावे (64, रा. सुभाषनगर, शुक्रवार पेठ) यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तिघा अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भावे ६ फेब्रुवारी रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास सारसबाग परिसरातील सणस मैदानजवळून निघाले होते. त्या वेळी दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी त्यांच्या हातातील मोबाईल हिसकावून नेला. भावे यांनी आरडाओरडा केला. मात्र, चोरटे भरधाव वेगाने टिळक रस्त्याकडे पसार झाले. पोलीस उपनिरीक्षक प्रकाश जगताप तपास करत आहेत.