बिपाशा बसू जिममध्ये दिसली घाम गाळताना; पोस्ट करत लिहिले,”आई कधीही हार मानत नाही. ”

आजकाल बिपाशा बसू पती करण सिंग ग्रोवरसोबत तिच्या आयुष्यातील सर्वात सुंदर क्षणांचा आनंद घेत आहे. बिपाशा बसूने 30 एप्रिल 2016 रोजी करण सिंग ग्रोवरसोबत लग्न केले. त्यानंतर तिने 12 नोव्हेंबर 2022 रोजी मुलीला जन्म दिला. तेव्हापासून बिपाशा पालकत्वाचा आनंद घेत आहे. अशात आता बिपाशाचा एक एनर्जीने भरलेला व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये ती जिममध्ये जोरदार वर्कआउट करताना दिसत आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Bipasha Basu (@bipashabasu)

 

बिपाशा बसूचा लेटेस्ट व्हिडिओमध्ये जिममध्ये घाम गाळताना दिसत आहे. 26 मे 2023 रोजी, बिपाशा बसूने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर स्वतःचा एक व्हिडिओ शेअर केला. व्हिडिओमध्ये, बिपाशा जिममध्ये घाम गाळताना दिसत आहे. बिपाशा पुन्हा स्लिम दिसण्यासाठी स्वत:ला फिट करण्यासाठी व्यायाम करतांना दिसत आहे.

या पोस्टसोबत बिपाशाने एक नोट शेअर केली आहे. ज्यात त्याने लिहिले की, ‘आई कधीही हार मानत नाही.बिपाशा शेवटची 2015 मध्ये आलेल्या ‘अलोन’ चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात तिच्या विरुद्ध करण सिंग ग्रोव्हर दिसला होता.