भाजपा आमदाराचा कहर! वृद्ध महिलेकडून धुवून घेतले पाय; टीकेनंतर म्हणाल्या,”आजच्या जगात…”

नवी दिल्ली : त्रिपुरातील सत्ताधारी भाजपच्या एका महिला आमदाराचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये एक वृद्ध महिला या आमदाराचे पाय धुताना  दिसत आहे. आमदाराच्या या कृतीमुळे त्यांच्यावर प्रचंड टीका होताना दिसत आहे. बदरघाटच्या आमदार मिमी मजुमदार यांनी पश्चिम त्रिपुरातील त्यांच्या मतदारसंघातील सूर्यपाडा या पूरप्रवण क्षेत्राला भेट दिली तेव्हा ही घटना घडली असल्याचे सांगण्यात येत आहे.

दुसरीकडे आमदाराने दावा केला आहे की, महिलेने प्रेम आणि आपुलकीने आपले पाय धुतले होते. सूर्यपारा येथील पूरग्रस्त भागाला भेट देणाऱ्या बदरघाटच्या आमदार मिमी मजुमदार यांनी दावा केला की, महिलेने प्रेम आणि आपुलकीने तिचे पाय धुतले होते. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक महिला मिमी मजुमदार यांचे पाय साबणाने आणि पाण्याने धुताना आणि टॉवेलने पुसताना दिसत आहे. या व्हिडिओच्या सत्यता आणखी कोणीही केलेली नाही. आमदार मिमी मजुदार परिसराची पाहणी पूर्ण केल्यानंतर महिलेने पाय धुतले.

बधरघाट उच्च माध्यमिक विद्यालयाच्या माजी मुख्याध्यापिका मिमी मजुमदार यांनी विधानसभा पोटनिवडणुकीचे तिकीट मिळण्याच्या काही दिवसांपूर्वी २०१९ मध्ये भाजपामध्ये प्रवेश केला होता. या घटनेबद्दल मिमी मजुमदार म्हणाल्या, “वयोवृद्ध महिलेने माझ्या प्रेमापोटी माझे पाय धुतले. महिलेने मला आपली मुलगी समजून हे केले. याकडे नकारात्मक दृष्टीकोनातून पाहिले जाऊ नये. चांगले काम करून एखाद्या आमदाराला लोकांकडून किती आदर मिळतो हे यावरून दिसून येते. माझा विश्वास आहे की आजच्या जगात कोणालाही कोणाचे पाय धुण्यास भाग पाडले जाऊ शकत नाही किंवा असे काहीही केले जाऊ शकत नाही.”

दरम्यान, विरोधी पक्ष सीपीएमने त्यांच्या अधिकृत फेसबुक पेजवर “फोटो शूट केल्यानंतर एका महिलेला आमदार मिमी मजुमदार यांचे पाय धुवावे लागले,” या कॅप्शनसह हा व्हिडिओ टाकला आहे. या घटनेला धक्कादायक असल्याचे म्हणत युवक काँग्रेसचे अध्यक्ष राखू दास म्हणाले, “हे सत्ताधारी पक्षाच्या आमदाराची मानसिकता दर्शवते. त्यांना (भाजपा) कठीण काळात लोकांबद्दल सहानुभूती नाही. सार्वजनिक प्रतिमा निर्माण करण्यासाठी ते फोटोशूटमध्ये व्यस्त आहेत.”