आसामच्या मुख्यंमत्र्यांना दाखवले काळे झेंडे

गुवाहाटी : आसाममध्ये नववर्षाच्या पहिल्या दिवशीही वादग्रस्त नागरिकत्व दुरूस्ती कायद्याच्या (का) विरोधातील निदर्शने सुरूच राहिली. निदर्शकांनी अनेक ठिकाणी आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांना काळे झेंडे दाखवले.

पूर्वनियोजित कार्यक्रमासाठी सोनोवाल यांनी दोन जिल्ह्यांमधून प्रवास केला. त्यावेळी विविध ठिकाणी निदर्शकांनी सोनोवाल यांच्या वाहनाच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले. निदर्शकांनी का आणि सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजीही केली.

कायद्यात रूपांतर होण्याआधी संसदेत मंजुरीसाठी विधेयक मांडण्यात आले तेव्हापासूनच त्याविरोधात निदर्शने सुरू झाली. त्यानंतर त्या निदर्शनांचे लोण देशभरात पसरले. देशात काही ठिकाणी निदर्शनांना हिंसक वळण मिळाले. आता नववर्षातही निदर्शने चालूच ठेवण्याचा निर्धार का विरोधकांनी केला आहे. त्याचे प्रत्यंतर आसामसह देशाची राजधानी दिल्लीतही आले.

 

 

 

Leave a Comment