देहविक्रय करणाऱ्या महिलेवर ब्लेडने वार; एकास अटक

पुणे : वेश्यावस्तीत देहविक्रय करणाऱ्या महिलेवर एकाने ब्लेडने वार केल्याची घटना घडली. याप्रकरणी फरासखाना पोलिसांनी एकास अटक केली आहे. लक्ष्मी भोई (वय ३५, रा. बुधवार पेठ) असे गंभीर जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे.

याप्रकरणी राजाप्पा सिद्धलिंगप्पा (वय ४०, रा. वडारवाडी, शिवाजीनगर) याला अटक करण्यात आली आहे. भोईने याबाबत फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दोन दिवसांपूर्वी रात्री भोई बुधवार पेठेतील वेश्यावस्तीतील राहत्या घरासमोर थांबली होती.

त्यावेळी आरोपी सिद्धलिंगप्पा आणि भोईचा किरकोळ कारणावरून वाद झाला. आरोपीने त्याच्याकडील ब्लेडने तिच्यावर वार केले. परिसरातील नागरिकांनी पकडून त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलीस उपनिरीक्षक पाटील तपास करत आहेत.