बॉबी देओलचा शर्टलेस लुक; धर्मेंद्र म्हणाले “माझा निरागस मुलगा…”

मुंबई – अभिनेता बॉबी देओल (Bobby Deol) सध्या त्याच्या चित्रपटामुळे चर्चेत आहे. चित्रपटांसह OTTवर देखील बॉबी देओलची जादू पाहायला मिळते. चित्रपटांसह बॉबी देओल आजकाल त्याच्या फिटनेसमुळे चांगलाच चर्चेत असतो. जिममध्ये वर्कआउट करत असताना, तो सोशल मीडियावर त्याचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतो, जे त्याच्या चाहत्यांनाही खूप आवडतात. नुकतेच बॉबीने त्याच्या आगामी अ‍ॅनिमल चित्रपटातील शर्टलेस लुकचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

या चित्रपटात बॉबी देओल नकारात्मक भूमिका साकारत आहे ज्यासाठी त्याने खूप मेहनत घेतली आहे. त्याच्या फिटनेसकडे त्याने विशेष लक्ष दिल्याचे समोर येत आहे. नुकतेच त्याने शेअर केलेल्या फोटोमध्ये ते स्पष्टपणे दिसत आहे. बॉबीचा हा लुक चाहत्यांच्याही प्रचंड पसंतीस पडत आहे. इतकेच काय तर धर्मेंद्र देखील बॉबीच्या या लुकवर फिदा झाल्याचे पाहायला मिळाले आहे. बॉबीचा एक व्हिडिओ त्यांनी शेअर केला आहे.

बॉबीच्या लूकला पाहून केवळ त्याचे चाहतेच नाही तर मनोरंजन विश्वातील कलाकारही त्याचे कौतुक करत आहे. 2 ऑक्टोबरला धर्मेंद्र यांनी सोशल मीडियावर अ‍ॅनिमलच्या टीझरमधून बॉबी देओलची झलक शेअर केली आहे. यात तो शर्टलेस दिसत आहे. हा व्हिडिओ शेअर करत धर्मेंद्र यांनी लिहिले की, ‘माझा निरागस मुलगा अ‍ॅनिमल’मध्ये. तर या व्हिडिओवर ते लिहितात की, ‘तुम्ही सर्व ऐका, 1 डिसेंबरला थिएटरमध्ये यायचं नाहीतर…’

‘अ‍ॅनिमल’ 1 डिसेंबरला होणार प्रदर्शित 

दरम्यान, ‘अ‍ॅनिमल’ चित्रपट 1 डिसेंबरला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात रणबीर कपूर, रश्मिका मंदान्ना, बॉबी देओल आणि अनिल कपूर देखील दिसणार आहेत. बॉबी शेवटचा ‘आश्रम 3’ या वेब सीरिजमध्ये दिसला होता ज्यामध्ये त्याने काशीपूरच्या बाबा निरालाची भूमिका केली होती.