भाजप नेते व माजी मंत्री आत्माराम तोमर यांची गळादाबून हत्या

उत्तर प्रदेश – भाजप नेते आणि माजी मंत्री आत्मराम तोमर यांची राहत्या घरात गळादाबून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बडौतच्या बिजरौल रोड येथील निवासस्थान ही घटना घडली असून त्यांच्या निवासस्थानामधून एक कार सुद्धा गायब आहे.

तोमर यांचा ड्रायव्हर सकाळी घरी आल्यावर त्याच्या हा प्रकार लक्षात आला आहे. ड्रायव्हर विजय जेव्हा तोमर यांच्या निवासस्थानी पोहचला तेव्हा दरवाजा आतून बंद होता आणि कार जागेवर नसल्याचे लक्षात आले. दरम्यान, दरवाजा तोडून आत प्रवेश केल्यानंतर बेडवर तोमर यांचा मृतदेह होता आणि त्यांच्या चेहऱ्यावर टॉवेल पडलेला होता. त्यानंतर विजने तात्काळ पोलिसांना संपर्क केला.

आत्माराम तोमर जनता वैदिक कॉलेजचे मुख्य प्राध्यापक देखील राहिले आहेत. त्यांनी १९९३ साली छपरौली विधानसभा मतदार संघातून भाजपाच्या तिकीटावर निवडणूक देखील लढवली होती आणि १९९७ साली भाजपानं त्यांना मंत्रिपद देखील दिले होते.

दरम्यान, टॉवेलचा वापर करुन आत्माराम तोमर यांचा गळा दाबून त्यांची हत्या करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. पुढिल तपास पोलिस करत आहेत.