बोनी कपूर – श्रीदेवी यांच्या लग्नामुळे अर्जुन कपूर नाराज

वडील बोनी कपूर यांनी श्रीदेवीबरोबर लग्न करण्यासाठी आपल्या आईला घटस्फोट दिला होता, ही बाब त्याला अजून डाचते आहे. त्याने ही बाब इतक्‍या वर्षांनी बोलून दाखवली आहे. 

आपल्याला हे सर्व सहजपणे स्वीकारणे शक्‍य झाले नाही, असे सोशल मीडियावर पोस्ट झालेल्या एका इंटरव्ह्यूमध्ये अर्जुनने म्हटले आहे. 

आईला वडील बोनी कपूर यांच्यामुळे खूप दुःख सहन करावे लागले होते. मात्र, तरीही तिने आपल्याला बोनी यांचीच साथ देण्याचा सल्ला दिला होता. प्रेम ही खूपच कॉम्प्लिकेटेड गोष्ट आहे.

पप्पा दुसऱ्या कोणाच्या प्रेमात पडले आहेत, हे तेव्हा पचवणे खूप अवघड गेले होते. प्रेम एकदाच होऊ शकते असे तेव्हा वाटले होते. पण आता तसे वाटत नाही. 

कारण प्रेम खूपच गुंतागुंतीचे असते. त्यांचे वर्तन आपल्या दृष्टिकोनातून तरी “योग्य होते’, असे मी तरी म्हणू शकत नाही, असेही अर्जुन म्हणाला.