BREAKING NEWS : विरोधी पक्ष नेतेपदी ‘जितेंद्र आव्हाड’ यांची नेमणूक

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नऊ आमदारांनी आज शिंदे-फडणवीस  सरकारमध्ये सामील होत राजभवनावर मंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यपाल रमेश बैस यांनी त्यांना राजभवनातील दरबार हॉलमध्ये पद व गोपनीयतेची शपथ दिली.

आज मंत्रिपदाची शपथ घेतलेल्यांमध्ये छगन चंद्रकांत भुजबळ, दिलीप दत्तात्रय वळसे- पाटील, हसन मियालाल मुश्रीफ, धनंजय पंडितराव मुंडे, धर्मरावबाबा भगवंतराव आत्राम, आदिती सुनील तटकरे, संजय बाबूराव बनसोडे, अनिल भाईदास पाटील यांचा समावेश आहे.

दरम्यान, अजित पवारांनी बंड केल्याचे समोर आल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसमधील नव्या नेत्यांकडे काही जबाबदारी देण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रतोद आणि विरोधी पक्ष नेतेपदी ‘जितेंद्र आव्हाड’ यांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यामुळे यापुढे आता जितेंद्र आव्हाड नवे विरोधी पक्ष नेते म्हणून काम पाहणार आहे.