Breaking News : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांचे निलंबन मागे; राज्यसरकारने घेतला मोठा निर्णय

मुंबई – मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांचे निलंबन मागे घेण्याचा निर्णय राज्यसरकारने घेलता आहे. राज्याचे माजी गृहमंत्री राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांच्यावर त्यांनी 100 कोटी रुपये वसुली करण्याचे आदेश दिल्याचा आरोप करण्यात आला होता. राज्यसरकारच्या या निर्णयाचा विरोधी पक्षांनी तीव्र विरोध केला आहे.

अनिल देशमुख यांनी परमबीर सिंग यांच्यावर केलेले सर्व आरोप मागे घेण्यात आले आहे. डिसेंबर 2021 मध्ये जारी केलेलं निलंबन मागे घेतले असून निलंबनाचा कालावधी ऑन ड्युटी मानला जावा असे सरकारने काढलेल्या आदेशात म्हटले आहे.

दरम्यान, महाविकास आघाडी सरकारच्या काळात परमबीर सिंग यांचे निलंबन करण्यात आले होते. त्यामुळे शिंदे सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे परमबीर सिंह यांना मोठा दिलासा मिळाला आहे.