तालिबान्यांनी लागू केलेला शरिया कायदा भारतात आणा, मग महिलांवरील अत्याचार थांबतील

मुंबई –  राज्यात दिवसेंदिवस महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. नुकताच साकीनाका बलात्कार आणि हत्या प्रकरणाने महाराष्ट्र हादरून निघाला होता. ही घटना ताजी असतानाच आता पुन्हा एका अशीच  धक्कादायक घटना दररोज समोर येत आहे .

वाढत्या गुन्हेगारीवरून राज्यातील विरोधी नेत्यांकडून  महाविकासआघाडी सरकारवर जोरदार हल्ला होत आहे.  राज्यात कायदा-सुव्यवस्थेचे इतके धिंडवडे कधीही निघाले नव्हते, अशी टीका विरोधी पक्षाकडून केली जात आहे.  यावरुन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी  नाशिक येथील दौऱ्या दरम्यान त्यांनी मत मांडल आहे. ‘शरियतसारखा कायदा आणा, मग महिलांवरील अत्याचार थांबतील’ असंही ते म्हणाले आहे.

 राज ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेतील महत्वाचे मुद्दे 

-गृहमंत्र्यांना ईडी बोलवते. ते ईडीकडे जात नाहीत. त्यांनी ईडीलाच वेड्यात काढलंय.

-सगळेच लोक एकमेकांना फोन करून सांगतात की काय की मूळ प्रश्नावरून लक्ष विचलित करण्यासाठी हा खेळ खेळूया.

-फक्त स्थानिक स्वराज्य संस्थेतील महापालिकेतच ही पद्धत का? सगळा खेळ सुरू आहे.

-जनतेला गृहित धरून निर्णय घेतले जातात. निवडणूक आयोगानं याची गंभीर दखल घ्यायल हवी.

-सत्ता काबिज करण्यासाठी बहुसदस्यीय प्रभाग पद्धत आणली गेली.