ब्रिटन कोणत्याही ठरावाशिवायच “ब्रेक्‍झिट’ स्वीकारेल – युरोपियन संघाची भीती

ब्रुसेल्स (बेल्जियम) – पुढील आठवड्यामध्ये ब्रिटन कोणत्याही ठरावाशिवायच युरोपिय संघामधून बाहेर पडेल, अशी भीती युरोपिय संघाचे मध्यस्थ मायकेल बारनेर यांनी व्यक्त केली अहे. कोणत्याही ठरावाशिवाय ब्रिटनच्या संसदेचे एका पाठोपाठ एक दिवस वाया चालले आहेत. त्या पर्श्‍वभुमीवर ब्रुसेल्समधील मुत्सदी आणि विचारवंतांसमोर बोलताना त्यांनी ही भीती व्यक्‍त केली. दोनच दिवसांपूर्वी ब्रिटनच्या संसदेमध्ये खासदारांनी पंतप्रधान थेरेसा मे यांनी मांडलेला प्रस्ताव तिसऱ्यांदा फेटाळून लावला.

कोणत्याही ठरावाशिवाय ब्रिटनने युरोपिय संघातून बाहेर पडणे कोणाच्याही हिताचे नाही. तसे व्हावे असे कोणालाही वाटलेही नव्हते. मात्र युरोपिय संघाच्या 27 व्या बैठकीची पूर्वतयारी झाली आहे. त्यामुळे ही भीती आता जाणवायला लागली आहे, असे बारनेर यांनी सांगितले.

ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी आगोदरच “ब्रेक्‍झिट’च्या करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. हा करार युरोपिय संघ, युरोपिय संसद आणि ब्रिटन सरकार यांच्यात चार महिन्यांपूर्वी म्हणजे गेल्या वर्षी 25 नोव्हेंबर रोजी झालेला आहे, हे विसरू नये. ब्रिटन 29 मार्च रोजी युरोपिय संघातून बाहेर पडावे म्हणून आम्ही प्रयत्न केले होते. मात्र तसे झाले नाही. मात्र योग्य रितीने ब्रिटनने बाहेर पडायचे असल्यास ठराव होणे गरजेचे आहे, असे बारनेर म्हणाले.

Leave a Comment