nagar | रेशनिंगच्या अन्न-धान्याच्या लाभासाठी कचेरी समोर बसपाचे उपोषण

नगर, (प्रतिनिधी) – शहरात अन्न सुरक्षा योजनेच्या लाभार्थींना रेशनिंगच्या अन्न-धान्याचा लाभ मिळावा, यासाठी बहुजन समाज पक्षाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालया समोर उपोषण करण्यात आले. तसेच दर्गाच्या जागेत अतिक्रमण करुन धार्मिक भावना दुखावणाऱ्यांवर गुन्हे दाखल करुन अतिक्रमण हटवावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

यावेळी बसपाचे जिल्हा प्र. सुनील ओहोळ, जिल्हाध्यक्ष उमाशंकर यादव, जिल्हा महासचिव राजू शिंदे, जिल्हा उपाध्यक्ष शहानवाज शेख, जिल्हा सचिव सुभाष साबळे, बाळासाहेब काते, शहराध्यक्ष फिरोज शेख पत्रेवाला, महिला जिल्हा उपाध्यक्षा अंजुम सय्यद, मनिषा जाधव, प्रकाश आहेरे, माहादेव त्रिभुवन, मेहबूब पठाण, छगनराव पानसरे, राकेश कुमार, शबाना पठाण, जुलेखा पठाण, समीना पठाण, सद्दाम सय्यद, अमीर पठाण, खलील शेख, छबुराव मोरे, सुरज यादव, वेदांत गायकवाड, ऋक्षीकेश वाघमारे आदी उपस्थित होते.

शहरात अन्न सुरक्षा योजनेच्या अनेक लाभार्थींना रेशनिंगचे धान्य दिले जात नाही. रेशनिंग दुकानदार सर्वसामान्य नागरिकांशी अरेरावीची भाषा करुन उडवाउडवीची उत्तरे दिली जातात.

वंजार गल्ली येथील तो दुकानदार देखील सर्वसामान्यांची पिळवणुक करत असून, अनेक वर्षांपासून लाभार्थींना अन्न-धान्याचा लाभ देत नाही. लाभार्थींना अन्न-धान्यापासून वंचित ठेवणाऱ्या रेशन दुकानदारावर कारवाई व्हावी व अन्न सुरक्षा योजनेच्या लाभार्थींना अन्न-धान्याचा लाभ मिळण्यासाठी उपोषणकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला होता.

बेलदार गल्ली, दालमंडई येथील पीर कालाशहा लोहारशहा दर्गाचा दरवाजा तोडून अनधिकृत बांधकाम करण्यात आले आहे. यामुळे मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत. अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांना महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी मदत करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

दर्गाचा दरवाजा तोडून अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करावे, याप्रकरणी कारवाई करण्यास टाळाटाळ करणाऱ्या मनपाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.