2100 पर्यंत पृथ्वीवरील 83 टक्के हिमक्षेत्रे वितळणार

जागतिक तापमान वाढीची तीव्रता वाढल्याचा परिणाम

वॉशिंग्टन : ग्लोबल वॉर्मिंग म्हणजेच जागतिक तापमान वाढीचे अनेक दुष्परिणाम आता दिसू लागले आहेत. या शतकाच्या अंतापर्यंत या ग्लोबल वॉर्मिंगचा सर्वाधिक फटका पृथ्वीवरील हिमक्षेत्रांना बसणार असून हे शतक संपेपर्यंत म्हणजे 2100 उजाडेपर्यंत पृथ्वीवरील 83 टक्के हिमक्षेत्रे वितळून नष्ट झाली असतील असा संशोधकांचा अंदाज आहे.

जगातील आघाडीच्या सायन्स नावाच्या नियतकालिकात याबाबतचा लेख प्रसिद्ध झाला असून हे संशोधन प्रसिद्ध करण्यापूर्वी संशोधकांनी पृथ्वीवरील दोन लाखापेक्षा जास्त छोट्या-मोठ्या हिमक्षेत्रांचा अभ्यास केला आहे. आगामी कालावधीमध्ये जगभरातील लोकांनी जर तापमान वाढीमध्ये दहा टक्के घट करण्यात जरी यश मिळवले तर ही हिमक्षेत्रे वाचू शकतील असेही या लेखात म्हटले आहे.

मात्र तापमान वाढीचा वेग आता आहे. तसाच राहिला तर या शतकाच्या अंतापर्यंत अगदी थोडी हिमक्षेत्रे पृथ्वीवर अस्तित्वात राहणार आहेत हिमक्षेत्रे वितळून जाण्याच्या प्रक्रियेचा दुसरा धोका शास्त्रज्ञानी नजरेस आणून दिला आहे. हिमक्षेत्रे वितळ्यामुळे आपोआपच समुद्रातील पाण्याची पातळी वाढणार आहे आणि समुद्रकिनारी असलेल्या अनेक शहरांना त्यामुळे धोका उत्पन्न होणार आहे.