पिंपरी | भाजपा कायदा आघाडीतर्फे ॲड. नाराशक्‍ती ॲवार्ड

पिंपरी, (प्रतिनिधी) – भाजपच्‍या पिंपरी-चिंचवड कायदा आघाडीच्‍या वतीने महिला दिनानिमित्त ॲडव्‍होकेट नारीशक्‍ती ॲवार्ड हा पुरस्‍कार महिला वकिलांना प्रदान करण्यात येणार आहे. यासाठी ॲड. संगीता परब, ॲड. शोभा कड, ॲड. शोभा कदम, ॲड. तारा नायर, ॲड. दिपाली डुंबरे यांची निवड करण्यात आली आहे, अशी माहिती भाजप कायदा आघाडीचे शहराध्यक्ष ॲड. गोरखनाथ झोळ यांनी दिली.

ॲड. झोळ यांनी सांगितले की, शहराध्यक्ष शंकर जगताप, आमदार महेश लांडगे, आमदार अश्विनी जगताप, आमदार उमा खापरे यांच्‍या मार्गदर्शनाखाली महिलादिनानिमित्त या कार्य्रकमाचे आयोजन करण्यात आले आहे. भाजप कायदा आघाडीतर्फे यापुढे दरवर्षी पाच महिला वकिलांना हा पुरस्कार देऊन सन्‍मानित करण्यात येणार आहे.

काळेवाडी येथील बालाजी लॉन्समध्ये सकाळी साडे दहा वाजता हा कार्यक्रम होणार असून या कार्यक्रमासाठी शहराध्यक्ष शंकर जगताप, आमदार महेश लांडगे, आमदार अश्विनी जगताप, आमदार उमा खापरे, माजी खासदार अमर साबळे, सदाशिव खाडे, कायदा सेलचे प्रदेशाध्यक्ष ॲड. धर्मेंद्र खांडरे उपस्थित राहणार आहेत.

कार्यक्रमाच्‍या नियोजनासाठी महिला शहराध्यक्ष सुजाता पलांडे, कायदा आघाडीच्‍या महिला अध्यक्षा ॲड. पल्‍लवी विघ्ने तसेच सर्व पदाधिकाऱ्यांचे सहकार्य मिळाले, असे ॲड. झोळ यांनी सांगितले.