आता मी स्वतःला “गुरुपूजा पंडित” म्हणू शकते का? प्राजक्ता माळीने पोस्ट करत विचारला प्रश्न

मुंबई – अभिनेत्री प्राजक्ता माळीने आपल्या मेहनतीच्या जोरावर सिनेसृष्टीत स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. सिने क्षेत्रासह तिने व्यावसायिक क्षेत्रात देखील पाऊल ठेवले आहे. मागील वर्षी तिने ‘प्राजक्तराज’ नावाचा ज्वेलरी ब्रँड लाँच केला. त्यानंतर तिने  तिचं नवं फार्म हाऊस खरेदी केले आहे. याचे काही फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले होते. ती नेहमीच तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत असते.

अशात प्राजक्ता पुन्हा एकदा सोशलवरील पोस्ट चर्चेत आली आहे. सोशल मीडियावरील पोस्टमध्ये प्राजक्ताने लिहिले आहे, ‘मी आता स्वतःला “गुरूपूजा पंडीत” म्हणु शकते का? काल बॅंगलोर आश्रमात Art of living foundation चा -“गुरूपूजा” course पुर्ण केला…तब्बल २२ देश आणि सबंध भारतातून ६३० जण ह्यात सहभागी झाले होते. ह्या course ला किती महत्व आहे, हे आर्ट ऑफ लिव्हिंग कुटुंब समजू शकेल. माझ्या आयुष्यात आणखी एका कामगिरीची नोंद’. दरम्यान, आर्ट ऑफ लिव्हींगच्या आश्रमात प्राजक्ता पोहोचली आहे.  तिने आर्ट ऑफ लिव्हिंगचे कोर्समधले व्हिडीओ शेअर केले आहेत. यापूर्वीही तिने आर्ट आर्ट ऑफ लिव्हींगच्या शो दरम्यान श्री श्री रवी शंकर यांना लग्नाचा प्रश्न विचारला होता. या दरम्यानचा व्हिडिओही चांगलाच व्हायरल झाला होता.

“प्राणायम, योग, मेडिटेशन, म्युझिक, सात्विक लिविंग, सात्विक अन्न, पंचकर्म, निसर्ग आणि बरंच काही संयोजन या गोष्टी 3 महिन्यातून एकदा अनिवार्य आहेत”, असं प्राजक्तानं तिच्या एका पोस्टमध्ये सांगितले आहे.

दरम्यान, प्राजक्ताच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास, मालिका, चित्रपट, वेबसिरीज यात प्राजक्ताने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. सध्या महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमात सूत्रसंचालन करताना दिसत आहे.