व्हाईट हाऊसच्या प्रवेशद्वाराला धडकली कार, चालकाचा मृत्यू

वॉशिंग्टन – व्हाईट हाऊसच्या मुख्य प्रवेशद्वाराला एक कार धडकून झालेल्या अपघातात आज चालकाचा मृत्यू झाला. या अपघातानंतर लगेच सुरक्षा विषयक उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात आली.

मात्र हा निव्वळ अपघात असल्याचे प्राथमिक तपासामध्ये आढळून आले. या अपघातामुळे व्हाईट हाऊसला कोणताही धोका नसल्याचे स्पष्ट झाले असल्याचे यूएस सिक्रेट सर्व्हिसेसच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

अपघातानंतर चालकाचा मृत्यू झाल्यामुळे या अपघातामागील कारण अथवा हेतू स्पष्ट होऊ शकला नाही. या चालकाची ओळख पटू शकलेली नाही.