#CaronaVirus : त्यामुळे केली परदेशी व्यक्तीला अटक

मुंबई – सध्या करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सर्व जग हादरले आहे. आता पर्यंत या प्राणघातक विषाणू पासून अनेक नागरिकांनी आपला जीव गमावला आहे. करोना व्हायरसचा वाढता प्रभाव पाहता सरकारने तातडीने सर्व ठिकाणे बंद करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात अनेक गोष्टींचे उत्पादन घटले आहे. 

दरम्यान, या व्हायरसपासून वाचण्यासाठी लोक मोठ्या प्रमाणात अफवा पसरत असून, अनेक लोक या अफवांवर विश्वास सुद्धा ठेवत आहेत.

केरळमध्ये एका परदेशी व्यक्तीला अँटी कोरोना व्हायरस ज्यूस विकताना अटक करण्यात आले आहे. ही व्यक्ती 150 रुपयांना हा ज्यूस विकत होती.

ही परदेशी व्यक्ती तिरुवनंतपुरम येथून 45 किमी लांब ‘प्लेस वर्कला’ येथे ज्यूस विकत होती. हा व्यक्ती कॅफे टेंपल नावाने कॅफे चालवत होता. त्याने बाहेर अँटी कोरोना व्हायरस ज्यूस नावाचा बोर्ड देखील लावला होता. मात्र, आता या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

दरम्यान, चौकशी नंतर असे समोर कि हा केवळ आले, लिंबू आणि गुसबेरीने बनलेला एक साधा ज्यूस होता. आणि त्यालाच या व्यक्तीने ‘अँटी कोरोना व्हायरस ज्यूस’ असे नाव दिले होते.

 

Leave a Comment