नगर | नालेसफाईच्या कामाला मनपाकडून मुहूर्त

नगर – महापालिकेच्या वतीने सुरू असलेल्या नालेसफाईच्या कामाला गती देण्यात आली आहे चार पोकलेन व एका जेसीबीच्या साह्याने पाच ठिकाणी काम सुरू आहे. यात गुलमोहर रोड परिसरातील मंगल हाउसिंग सोसायटी जवळ असलेल्या नाल्यात टाकण्यात आलेले पाईप हटवून प्रवाह मोकळा करण्यात आला आहे. येत्या काही दिवसात नगर शहरातही पावसाला सुरुवात होण्याची चिन्हे आहेत. या पार्श्वभूमीवर प्रशासक … Read more

अहमदनगर | खासगी सावकरांवर सहकार कार्यालयाचे छापे

संगमनेर – तालुक्याच्या पठार भागातील साकूर या बाजारपेठेच्या मोठ्या गावात अवैध सावकारांचा उपद्रव वाढला आहे. अव्वाच्या सव्वा व्याजदराने अडल्या नडल्यांना कर्ज देताना, कर्जापोटी त्यांच्या मालमत्ता हडप करण्याच्या सावकारांच्या प्रयत्नांना सहकार उपनिबंधक कार्यालयाच्या हस्तक्षेपामुळे कायद्याचा लगाम लागला आहे. संगमनेरच्या सहकार उपनिबंधक कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी प्राप्त तक्रारीनुसार या सावकारांच्या घरावर केलेल्या कारवाईत कर्जासाठीची अनेक कागदपत्रे आढळल्याने खळबळ उडाली … Read more

नगर – अॅड. अभय आगरकरांची तातडीने हकालपट्टी करा

नगर  – लोकसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला ‘पराभवास सामोरे जावे लागले. भाजपचा हक्काचा मतदारसंघ हाता- तून गेल्याने पक्षातून मोठ्याप्रमाणात नाराजी व्यक्त होत आहे. शहराच्या ढिसाळ नियोजना अभावी व गटातटाच्या कारभारामुळे पक्षाच्या उमेदवाराचे नगर शहरातील मताधिक्य कमी झाल्याने पराभव झाला, असा आरोप करत याबाबत थेट पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंदशेखर बावनकुळे यांच्याकडे भिंगार छावणी परिषदेचे उपाध्यक्ष वसंत राठोड … Read more

सर्वांना बरोबर घेऊन परिसराचा विकास करणार – खासदार नीलेश लंके

शेवगाव – कामे सांगत रहा, कायम संपर्कात रहा. मी खासदार झालो असा अहम भाव मला वाटता कामा नये. लंके आपल्यातलाच आहे हीच भावना आपली रहावी, हेच नाते जपू या. माझ्यावर तुमचा अधिकार आहे. कामासाठी विनंती करायची नाहीतर अधिकार वाणीने कामे सांगा. कुठेही जातीय तेढ निर्माण होऊ देऊ नका. सगळा समाज गुण्यागोंविदाने नांदायला हवा. अठरापगड समाजाला … Read more

लंके समर्थंकांचा राक्षसी पध्दतीने विजय साजरा

मोठ्या ताई त्यांना शिक्षा देणार की? पाठीशी घालणार नगर – पारनेर तालुक्यातील महिलेस खा.निलेश लंके समर्थक राहुल झावरे आणि त्यांच्या समर्थकांनी घरात जावून जातीवाचक शिवीगाळ असे कृत्य केले. या घटनेचे तीव्र पडसाद जिल्ह्यात आणि राज्यात उमटले आहेत. या घटनेबाबत भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. निलेश लंके यांचे समर्थक राक्षसी … Read more

नगर | शहरासह जिल्ह्यात पावसाची दमदार हजेरी

नगर – गेल्या अनेक दिवसांपासून शेतकर्‍यांसह समान्य माणसांना प्रतिक्षा असणार्‍या पावसाने शुक्रवारी रात्री जिल्ह्याच्या अनेक भागात दमदार हजेरी लावली आहे. यात नगर, राहुरी तालुक्यासह अन्य ठिकाणी पाऊस झाला आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे. हा पाऊस पेरणीसाठी पुरेसा नसला तरी यापावसामुळे अनेक ठिकाणी शेतीच्या पेरणीपूर्व मशागतींना सुरूवात होणार आहे. यंदा जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात … Read more

‘रयत’मध्ये निवड झालेले 645 शिक्षक नियुक्तीच्या प्रतीक्षेत पवित्र पोर्टलद्वारे निवड

दीपक नामदे कलेढोण : राज्य सरकारने शिक्षक भरतीसाठी सुरू केलेल्या ‘पवित्र पोर्टल’च्या माध्यमातून घेण्यात आलेल्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीतून (टेट) शिक्षक उमेदवारांची निवड करण्यात आली. त्यातील बहुतांश शिक्षकांना राज्यातील जिल्हा परिषदांनी नियुक्त्या दिल्या. मात्र, उच्च गुण मिळवूनसुद्धा रयत शिक्षण संस्थेतील शिक्षक नियुक्तीपासून वंचित आहेत. ‘पवित्र पोर्टल’साठी रयत शिक्षण संस्थेने 808 जागांची जाहिरात दिली होती. … Read more

नगर | संशोधन व प्रबंध विकत घेवून वांझोटे संशोधन करू नका : प्रा.सुभाष शेकडे

नगर – संत एकनाथ महाराजांनी ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे केलेले संशोधन हे पहिले संशोधन. सर्व संत मंडळींनी या भूमीला ज्ञानाचे विलोभनीय दान दिले आहे. चिकित्सक पणे संशोधन करून मिळालेल्या ज्ञानाचा वापर समाज हितासाठी करावा. स्वतः अनेक ठिकाणी जाऊन संशोधन करून संदर्भ गोळा करा. संशोधन व प्रबंध विकत घेवून वांझोटे संशोधन करू नका. आपल्याच कष्टातून पूर्ण झलेल्या संशोधनाने … Read more

बोगस कांदा अनुदान प्रकरण भोवले

श्रीगोंदा – बोगस कांदा अनुदान लाटण्याच्या उद्देशाने संगनमताने शासनाची १ कोटी ८८ लाख ४७ हजार ५२४ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी जिल्हा विशेष लेखापरीक्षक (सहकारी संस्था) राजेंद्र फकिरा निकम यांच्या फिर्यादीवरून श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव दिलीप डेबरे यांच्यासह सोळा जणांविरुद्ध श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सचिव दिलीप लक्ष्मण डेबरे (रा.वेळू, ता.श्रीगोंदा), आडते/व्यापारी हवालदार … Read more

नगर | दरोड्याच्या तयारीत असलेले ४ आरोपी जेरबंद

नगर |  नगर-मनमाड बायपास रोडवरील साईबनकडे जाणारे रोडलगत अंधारात दबा धरून बसलेले दरोडेखोरांची टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केली आहे. त्यांच्याकडून १ लाख ९२ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. मात्र एक अंधाराचा फायदा घेत पळून गेला. प्रज्वल प्रताप देशमुख (वय २२, रा. जवळेकडलग, ता. संगमनेर), अशोक रघुनाथ गोडे (वय २४), भरत लक्ष्मण गोडे … Read more