कृष्णा-भीमा स्थिरीकरण योजनेत जामखेड तालुक्याचा समावेश करा; आमदार राम शिंदे यांची सरकारकडे मागणी

जामखेड  – कृष्णा भीमा स्थिरीकरण योजनेत जामखेड तालुक्याचा समावेश व्हावा, यासाठी आमदार प्रा.राम शिंदे यांनी राज्य सरकारकडे पाठपुरावा केला आहे. याबाबत आमदार शिंदे यांनी उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून मागणी केली आहे. त्यानंतर जलसंपदा विभागाने कृष्णा खोरे विकास महामंडळाकडून याबाबतचा अहवाल मागवला आहे. आमदार शिंदे यांनी केलेल्या महत्वपूर्ण मागणीमुळे जामखेड तालुक्यातील … Read more

नगर | बायजाबाईदेवी मंदिर परिसराची महिलांकडून स्वच्छता

नगर, (प्रतिनिधी)- जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ‘एम्प्रेस बाईकर्स’ या महिलांच्या ग्रूपने नगरजवळील जेऊर येथील बायजाबाईदेवी मंदिर परिसरात स्वच्छता केली. ट्रेक्रम्प अननोन संस्थेच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘एम्प्रेस बाईकर्स’ या ग्रूपने आतापर्यंत अनेक उपक्रम राबविले आहेत. या ग्रूपमध्ये बाईक चालविणर्‍या केवळ महिलाच आहेत. बाईक रॅली माध्यमातून विविध कार्यक्रम ‘एम्प्रेस बाईकर्स’ राबवित आहेत. त्याअंतर्गतच जागतिक पर्यावरण दिनी सकाळी 6 वाजता … Read more

nagar | छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन साजरा

टाकळीभान, (वार्ताहर) – श्रीरामपूर तालक्यातील टाकळीभान येथे अखंड महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्यभिषेक दिन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. टाकळीभान सोसायटीच्या कार्यालयामध्ये चेअरमन एकनाथ पटारे व व्हाईस चेअरमन रोहिदास बोडखे यांच्याहस्ते तर टाकळीभान ग्रामपंचायत कार्यालयाच्या प्रांगणात विविध मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. यावेळी अशोक … Read more

nagar | शिबिरात १९० आशासेविका सहभागी

श्रीरामूपर, (प्रतिनिधी)- श्रीरामपूर रोटरी क्लब व रोटरी क्लब, नगर सेंट्रल यांच्या संयुक्त विद्यमानाने आशासेविका व अंगणवाडी सेविकांसाठी मासिक पाळी व्यवस्थापन विषयावर प्रशिक्षण शिबिरात १९० आशासेविका सहभागी झाल्या होत्या. आशासेविका यांना एक पुस्तक व सर्टिफिकेट भेट देण्यात आल्याची माहिती रोटरी क्लब श्रीरामपूरचे अध्यक्ष भाग्येश कोठावळे यांनी दिली. श्रीरामपूर रोटरी क्लब व रोटरी क्लब सेंट्रल यांच्या संयुक्त … Read more

nagar | कृषी विभागाचे २६ हजार ३०० हेक्टर क्षेत्राचे उद्दिष्ट

श्रीरामपूर, (शहर प्रतिनिधी)- श्रीरामपूर तालुक्यात सध्या खरीप पेरणीपूर्व मशागतीच्या कामे वेगात सुरू झाली आहे. कृषी विभागानेही खरीप हंगामाची तयारी पूर्ण केली असून, यंदा २६ हजार ३०० हेक्टर क्षेत्राचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. गेली काही वर्षे सतत अतिवृष्टी, गारपीट आणि दुष्काळ अशा अस्मानी संकटातून बळीराजाने पुन्हा स्वतःला सावरून काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या खरीप हंगामाच्या तयारी सुरू … Read more

nagar | घरफोडी करणारी आंतरजिल्हा टोळी जेरबंद

नगर, (प्रतिनिधी) – घरफोडी करणार्‍या आंतरजिल्हा टोळीला अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. त्यांच्याकडून ७४ ग्रॅम सोने व ३०० ग्रॅम चांदी असा एकूण ५ लाख ३८ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. त्यांना सावेडी उपनगरातील पाईपलाइन रस्ता ते वडगाव गुप्ता गावाकडे जाणार्‍या रस्त्यावरील नातु बागेजवळून ताब्यात घेतले. किशोर तेजराव वायाळ … Read more

nagar | गळफास घेऊन एकाची आत्महत्या

नगर, (प्रतिनिधी) – राहत्या घरी गळफास घेऊन एकाने आत्महत्या केली. अमित शरद जेऊरकर (वय 45 रा. सावेडी गाव, नगर) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. अमित सावेडी गावातील बी – विंग, साई अपार्टमेंटच्या तीन नंबर बिल्डिंगमध्ये राहत होते. त्यांनी मंगळवारी सायंकाळी राहत्या घरात गळफास घेतला. त्यांच्या पत्नी करीना यांना माहिती मिळताच त्यांनी त्यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय … Read more

nagar | विरोधकांनी पराभव स्वीकारावा : किरण काळे

नगर, (प्रतिनिधी) – महाविकास आघाडीचे ॲड. राहुल झावरे यांच्यावर गुरुवारी हल्ला झाला. या हल्ल्याची शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी भ्याड हल्ला अशी भलावना करत निषेध केला आहे. राजकारणात जय, पराजय होत असतो. दोन्हीही पचविण्याची ताकद असावी लागते. विजयानं उन्मादून जायचं नसतं आणि पराजयान खचून जायचं नसतं. विरोधकांनी आता पराजय स्वीकारला पाहिजे, असे काळे म्हणाले. … Read more

nagar | नाशिक मतदार संघातून आप्पासाहेब शिंदेंचा अर्ज दाखल

नगर, (प्रतिनिधी) – नाशिक विभाग शिक्षक मतदार संघातून अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष आप्पासाहेब रामराव शिंदे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. नाशिक येथील आयुक्त कार्यालयात गुरुवारी (दि.६) रोजी शिंदे यांनी विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्याकडे अर्ज सुपुर्द केला. यावेळी नगर, नाशिक, धुळे, जळगाव व नंदुरबार जिल्ह्यामधून शिक्षक, कार्यकर्ते उपस्थित होते. नाशिक विभाग शिक्षक … Read more