काय आहे पुष्प चिकित्सा-फ्लॉवर थेरपी ?

फुले आवडत नाहीत असा माणूस आढळणे अशक्‍य नसले, तरी मुश्‍कील आहे. रंग गंध, रूप या साऱ्या गोष्टी फुलांमध्ये पाहून घ्याव्यात आणि त्यांचे प्रकार तरी किती. माहीत असलेले अनेक आणि माहीत नसलेले तर असंख्य. फुलांविना, फुलांच्या उल्लेखांविना आपला एक दिवसही जात नाही. देवाला वाहायला आपल्याला फुले लागतात, त्यापासून केलेले अत्तर लागते, अगरबत्त्या लागतात. सजावटीसाठी फुले लागतात … Read more

प्रथमोपचार पेटीत ‘ह्या’ गोष्टी असाव्यात

घरात आवश्‍यक असणारी गोष्ट म्हणजे प्रथमोपचार पेटी. विशेष करून घरात लहान मुले असतील तर हिची फारच आवश्‍यकता. सुटीत मुले खेळतात, धडपडतात, खरचटून घेतात, तेव्हा प्रथमोपचार पेटी आवश्‍यक असते. यात पुढील गोष्टी असाव्यात. 1) निरनिराळ्या आकाराच्या बॅंडेज पट्ट्या 2) जखमेवर बांधण्यासाठी जाळीची पट्टी 3) चिकटपट्टी 4) त्रिकोणी व गोल गुंडाळता येणारी बॅंडेजेस 5) औषधोपचारासाठी वापरला जाणारा … Read more

बकूळ-दंतरोगावर उपयुक्‍त औषध

दात हलण्यावर दातांच्या रोगांवर बकूळ हे अत्यंत उत्तम औषध आहे. दात हालत असल्यास बकुळीच्या सालीचे चूर्ण लावून दात घासावेत त्यामुळे दात घट्ट बसतात. दातांचे हालणे कमी होते. बकुळीच्या सालीच्या काढ्याने गुळण्या केल्या असता, म्हणजे वारंवार या काढ्याच्या चुळा भरून टाकल्यास कसेही कोणतेही दात हालत असल्यास एका आठवड्यात ते घट्ट होतात व सुजेवर कोणत्याही प्रकारच्या सूजेवर … Read more

अशी घ्या… उन्हाळ्यात पायांची काळजी

उन्हाळा सुरू झाला की जीव नुसता नकोसा होतो. भर दुपारच्या वेळी तर दूरच, पण सकाळीही घराबाहेर पडावेसे वाटत नाही. सारे नुसते भगभगीत, रखरखीत वाटते. रणरणत्या उन्हापासून बचावासाठी अनेक उपाय केले जातात. कूलर, फॅन यांचा वापर वाढतो. थंड पेये घेतली जातात. चेहऱ्याची काळजी घेतली जाते. त्यासाठी बाहेर जाताना मस्तक, चेहरा झाकला जातो. अंगभर कॉटनचे कपडे, गॉगल … Read more

अशी घ्या… बाळांच्या नाजूक व मुलायम त्वचेची काळजी

मुले म्हणजे देवाघरची फुले असे म्हटले जाते आणि ते खरेही आहे. खरोखरच लहान मुले फुलाप्रमाणेच असतात. त्यांची त्वचा फुलांच्या पाकळ्यांप्रमाणे कोमल असते. अगदी बालपणी मुलांच्या त्वचेमध्ये वेगाने बदल घडून येत असतात. लहानग्या अर्भकाची त्वचा, 2-3 वर्षांच्या बाळाची त्वचा व संपूर्ण वाढ झालेल्या व्यक्तीची त्वचा यामध्ये आमूलाग्र फरक असतो. बाळ जन्मल्यानंतर पहिल्या काही महिन्यांमध्ये सर्वसामान्यतः होणारे … Read more

मधुमेह : गोड नाव असलेला कडू आजार

गेल्या काही वर्षात संपूर्ण जगभरात मधुमेहाचा धोका वाढत चालला आहे. वेळीच जनतेची जागरूकता झाली नाही तर सन 2030 पर्यंत हा आजार जगातील सर्वात मोठा आजार ठरण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. मधुमेहाविषयी लोकांमध्ये जागरूकता वाढवणं गरजेचं आहे. आजार कुठे होतो, कसा होतो, याविषयी आपण काहीच सांगू शकत नाही. मधुमेहाला काही स्थळ आणि काळाच्या मर्यादा नाहीत. कित्येक … Read more

ब्राह्मे मुहूर्ते उत्तिष्ठे… आरोग्याचा मंत्र

-मृणाल गुरव वय झाल्यानंतर-निवृत्तीनंतर काय करावे हा प्रश्‍न बहुतेक सर्व ज्येष्ठांपुढे पडतो. त्यांच्यासाठी एक सोपा मंत्र सांगितलेला आहे. ब्राह्मे मुहूर्ते उत्तिष्ठे स्वस्थो रक्षार्थमायुष:’ पहाटे उठावे, बाहेर फिरायला जावे. यावेळी वातावरणात प्रदूषण कमी असते व शरीरातील मलमूत्र इत्यादी अधारणीयवेग निर्माण होण्यास, त्याचप्रमाणे मन व शरीर उल्हासित, आनंदी राहायला उपयुक्त आहे. कोमट पाणी प्यावे. जमल्यास वातप्रकृती व्यक्तीने … Read more

सौंदर्य खुलवण्यासाठी फळे!

-योगिता जगदाळे ज्या ज्या ऋतूत जी जी फळे येतात, ती भरपूर खावीत असे सांगितले जाते. सीझनल फळे खाणे हे अनेक दृष्टीने लाभदायक आहे. फळे आरोग्यासाठी तर उत्तमच असतात, पण ती सौंदर्यवर्धकही असतात. ऋतुमानानुसार बाजारात येणारी फळं फक्त उत्तम आरोग्यच नव्हे, तर सौंदर्यवर्धकही आहेत. सीझनल फळांच्या सौंदर्यवर्धक उपयोगांबाबत काही माहिती घेऊया. ऋतुमानानुसार बाजारात येणारी फळं फक्त … Read more

मानसिक आरोग्य

सतत घड्याळावर नजर, नुसती लगबग, कामावर जाण्याची धावपळ, लोकल पकडण्याची घाई. बसमध्ये शिरण्याची धडपड. रिक्षात चढण्याची धांदल. प्रत्येक क्षणी तणाव. हा तणाव आपल्या रोजच्या जगण्याचा भागच बनलाय. त्यातून लहान मुलेही सुटलेली नाहीत. त्यांनाही टाईमटेबल मागे लागलेले असते, प्रचंड स्पर्धा असते. गुणवत्तेचे ओझे असते. रोजच्या धावपळीमुळे आज प्रत्येकाच्या जीवनात ताण-तणाव वाढत आहे. विशेष करून शहरी भागात … Read more

स्वच्छतेतून आरोग्याकडे

-विद्या शिगवण 7 एप्रिल हा जागतिक आरोग्य दिन आहे. आरोग्य आणि स्वच्छता यांचा फार जवळचा संबंध आहे. आणि स्वच्छता व समृद्धी यांचाही अतूट संबंध आहे. या दृष्टीने आपल्या सरकारची स्वच्छ भारत योजना ही एक अत्यंत महत्त्वाची योजना आहे. प्रत्येक नागरिकाचे आरोग्य हे स्वच्छतेशी निगडित असल्याने स्वच्छतेवर अधिक भर देणे हे अनिवार्य आहे. मात्र दुर्दैवाने आपल्याला … Read more