जिल्हा न्यायालयाच्या कामकाजाला मिळणार बुस्टर

  पुणे – मर्यादित कर्मचाऱ्यांच्या उपस्थित आणि तत्काळ प्रकरणांपुरते सुरू असलेल्या जिल्हा न्यायालयाच्या कामकाजाला आता बुस्टर मिळणार आहे. येत्या सोमवारपासून (दि. 14) जिल्हा न्यायालयातील सर्व कोर्ट हॉल (न्यायालये) सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी सर्व न्यायाधीशांनी न्यायालयात येऊन महत्त्वाच्या प्रकरणांवर सुनावणी घ्यावी, असे परिपत्रक उच्च न्यायालयाने गुरुवारी काढले.   करोनामुळे मागील साडेपाच महिन्यांपासून न्यायालयीन कामकाज रेंगाळले … Read more

मास्टरमाईंडपर्यंत लवकरच पोलीस पोहोचणार

पुणे – कॉसमॉस बॅंक सायबर हल्ला प्रकरणातील मास्टरमाईंड सध्या दुबईत असल्याचा अंदाज तपास यंत्रणांकडून वर्तविला जात आहे. दहा दिवसांपूर्वी इंटरपोलने भारतातील रुपे कार्डमार्फत पैसे काढणाऱ्या टोळीच्या मास्टरमाईंड विरोधात रेड कॉर्नर नोटीस बजावली. त्यामुळे लवकरच पोलीस आरोपीपर्यंत पोहोचू शकणार आहेत. तब्बल दोन वर्षांनंतर ही नोटीस बजावली आहे. सायबर चोरट्यांनी कॉसमॉस बॅंकेच्या एटीएम स्वीच (सर्व्हर)चा प्रॉक्सी स्वीच … Read more

ऑनलाइन फसवणुकीचे सत्र कायम

पुणे – ऑनलाइन फसवणुकीचे सत्र कायम असून वेगवेगळ्या घटनांमध्ये चोरट्यांनी महिलांना 6 लाख रुपयांचा गंडा घातला. याबाबत येरवडा भागातील एका महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली. तक्रारदार महिलेच्या मोबाइल क्रमांकावर अज्ञाताने काही महिन्यांपूर्वी संपर्क साधला होता. परदेशात एका बड्या कंपनीत मनुष्यबळ विकास अधिकारी म्हणून नोकरीची संधी असल्याची बतावणी अज्ञाताने केली होती. त्यानंतर महिलेला परदेशातील नोकरीसाठी काही कागदपत्रांची … Read more

“ठाणे मेट्रो 4’चा मार्ग मोकळा

मुंबई : ठाणे मुंबईकरांच्या सेवेसाठी एमएमआरडीएमार्फत बांधण्यात येणाऱ्या मेट्रो 4 प्रकल्पाचा मार्ग मोकळा झाला आहे. या मेट्रो मार्गात येणाऱ्या 36 झाडे मोडण्यास परवानगी देताना न्यायालयाने 913 झाडांचे पुनरोपन काळजी पूर्वक करा, असे निर्देश एमएमआरडीए आणि पालिका प्रशासनाला दिले. ठाणे मुंबईकरांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी एमएमआरडीए मार्फत कासारवडवली(ठाणे) ते वडाळा मेट्रो 4 प्रकल्प उभारण्यात येणाऱ्या प्रकल्पासह … Read more

अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्याला 10 वर्षे सक्तमजुरी

पुणे : अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्याला दहा वर्षे सक्तमजुरी आणि सात हजार रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली. विशेष न्यायाधीश आर.व्ही.अदोणे यांनी हा आदेश दिला आहे. दंडापैकी पाच हजार रुपये पीडितेला नुकसान भरपाई म्हणून देण्यात यावेत, असेही न्यायालयाने आदेशात म्हटले आहे. सोमदत्त नंदू खरारे ऊर्फ डो भाई असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. याबाबत पीडित 16 वर्षीय … Read more

पिडीतेसोबत करणार बलात्कारी लग्न

चंदीगड : बलात्कार प्रकरणात तुरूंगात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला कैदी विवाह बंधनात अडकणार आहे. शिक्षा भोगत असलेल्या कैद्याला पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने चार आठवड्यांसाठी पॅरोल मंजूर केला आहे. हे प्रकरण हरियाणामधील कुरुक्षेत्र जिल्ह्यातील आहे. पॅरोलसाठी याचिका दाखल करणार्‍या कैद्याला कुरुक्षेत्र जिल्हा न्यायालयाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी पोक्सो कायद्यांतर्गत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. कोर्टात दाखल … Read more

चिमुरड्या मुलीला दुबईला नेणाऱ्या पित्याकडून मुलीचा ताबा आईला

नवी दिल्ली : सोडलेल्या पत्नीकडून मुलीला हिसकावून दुबईला नेणाऱ्या पित्याकडून मुलीचा ताबा काढून घेत तिच्या आईकडे संगोपनाची जबाबदारी दिल्ली न्यायलयाने सोपवली. दिल्ली बाहेर मुलीला नेणार नाही, असे हमीपत्र न्यायलयात देऊनही या पित्याने तिला दुबईला नेले होते. पित्याच्या या कृतीची दखल घेत कौटूंबिक न्यायलयाच्या मुख्य न्यायधिश स्वराना कांता शर्मा म्हणाल्या, मुलांची काळजी फुलाप्रमाणे घ्यावी लागते. मात्र, … Read more

‘रेरा’ अंतर्गत ग्राहकांचे हक्‍क आणि कर्तव्ये (भाग-२)

‘रेरा’ अंतर्गत ग्राहकांचे हक्‍क आणि कर्तव्ये (भाग-१) ग्राहकाला प्रवर्तकातर्फे यथास्थिती सदनिका, भूखंड किंवा इमारतीचा प्रत्यक्ष ताबा मिळाल्यानंतर, सामाईक क्षेत्राच्या कागदपत्रांसह आवश्‍यक ती सर्व कागदपत्रे आणि नकाशे, प्रवर्तकाकडून मिळण्याचा हक्‍क असेल. प्रत्येक ग्राहक, ज्याने कलम 13 अन्वये यथास्थिती सदनिका, भूखंड किंवा इमारतीबाबत विक्रीचा करार केला आहे तो विक्रीच्या करारात विनिर्दिष्ट केलेल्या रीतीने आणि वेळेत आवश्‍यक ती … Read more

भावनिक नाते संपलेल्या विवाहात घटस्फोटाचा अधिकार (भाग-२)

भावनिक नाते संपलेल्या विवाहात घटस्फोटाचा अधिकार (भाग-१) त्यावर सर्वोच्च न्यायालयाचे खंडपीठ म्हणते की, या अपीलात पती-पत्नी अनेक वर्षांपासून विभक्त आहेत, त्यामुळे त्यांच्यात वैवाहिक संबंध पुन:स्थापित होणे अशक्‍य आहे. त्यांचे वैवाहिक नाते संपुष्टात आले आहे. तसेच हितेश भटनागरच्या खटल्यात सांगितले आहे की, जर वैवाहिक सबंध जुळण्याचे सर्व प्रयत्न निरर्थक ठरले असतील, तर न्यायालय घटस्फोट मंजुर करु … Read more

कायद्याचा सल्ला

माझ्या आईंचे बॅंक ऑफ महाराष्ट्र येथे बचत खाते होते व त्यांचे खात्यामध्ये रक्कम रु. 18,000/- इतकी शिल्लक होती. माझ्या आईचा मागील आठवड्यात मृत्यू झाला. माझे आईने या बॅंक खात्यासाठी कोणाचेही नाव नॉमिनी म्हणून लावलेले नव्हते. तरी सदर खात्यावरील रक्कम मला मिळण्यासाठी काय प्रक्रिया करावी लागेल? सदरची रक्कम फारशी मोठी नसल्यामुळे तुम्हास मे. न्यायालयातून वारस दाखला … Read more