पिंपरी | मावळातील शेतकऱयांना प्रतीक्षा पावसाची

सोमाटणे, (वार्ताहर) – मावळ तालुक्यातील अनेक शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यावसाय करतात. त्यांच्यासाठी लागणाऱया चाऱयाचे डोंगरदऱ्यातील क्षेत्र कमी होत असून जनावरांचे आजार, औषध आणि चाऱ्याच्या वाढत्या खर्चाने दुग्धउत्पादक शेतकऱ्यांसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे, त्यांना पावसाची प्रतीक्षा आहे. मावळ तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. पावसाळ्यात डोंगरदऱ्यात जनावरांसाठी मुबलक चारा मिळत असल्याने शेतकऱ्यांना दुग्ध व्यवसायातून … Read more

पिंपरी | स्काऊट मास्टर, गाइड कॅप्टन शिबिराची सांगता

पिंपळे गुरव, (वार्ताहर) – महाराष्ट्र राज्य भारत स्काऊटस् आणि गाइडस् राज्य संस्था, पुणे जिल्हा भारत स्काऊटस् आणि गाइड, पुणे जिल्हा परिषद शिक्षण विभाग आणि प्रियदर्शनी ग्रुप ऑफ स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय शिक्षकांकरिता आयोजित स्काऊट मास्तर व गाइड कॅप्टन प्राथमिक प्रशिक्षण शिबिराची सांगता नुकतीच भोसरी येथे झाली. सात दिवसांच्या या प्रशिक्षणात जिल्ह्यातील 39 गाइड कॅप्टन व … Read more

पिंपरी | पॅराडाइज इंटरनॅशनल स्कूलमध्ये पर्यावरण दिन साजरा

पिंपळे गुरव, (वार्ताहर) – पॅराडाइज इंटरनॅशनल स्कूलमध्ये जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात शिक्षिकांनी सादर केलेल्या पर्यावरणावर आधारित नाट्यातून करण्यात आली. शिक्षकांनी या नाट्यातून पर्यावरणाचा वाढता र्‍हास व तो थांबविण्याचा उपाय हे पथनाट्य सादर केले. विद्यार्थ्यांकडून एक वृक्ष जगविण्याची प्रतिज्ञा घेतली. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले संस्थेचे अध्यक्ष अनंत काळे, संचालक नवनाथ काळे … Read more

पिंपरी | पर्यावरण जनजागृती स्पर्धेचे आयोजन

पिंपरी, (प्रतिनिधी) – ईसीए (पर्यावरण संवर्धन समिती) च्या माध्यमातून शाळा, कॉलेज व शहरातील सोसायटी गाव इत्यादी परिसरात एक विषय घेऊन पथनाट्य किंवा प्रत्यक्ष कृती करून, त्याचे सादरीकरण करून जनजागृती करणे. या स्पर्धेत ६ वर्षाच्या मुलीपासून तर ७० वर्षे वय असलेल्या नागरिकांनी सहभाग नोंदवला. पाणीबचत, वृक्ष लागवड, प्लास्टिक कचरा समस्या, ई कचरा समस्या जागतिक तापमान वाढ … Read more

पिंपरी | आत्करगावात टँकरने मोफत पाणीपुरवठा

खालापूर, (वार्ताहर) – – सुधाकर घारे यांनी घेतला पुढाकार खालापूर तालुक्यातील बहुतांश भागात अनेकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. अनेक ठिकाणची पाणीटंचाई दूर करण्यासाठी सामाजिक संस्था, राजकीय व नेते मंडळी पुढाकार घेत पाणीपुरवठा करत आहेत. आत्करगाव येथे गेल्या चार दिवसांपासून पाणीपुरवठा होत नसल्याने ग्रामस्थ त्रस्त झाले होते. त्याची दखल राष्ट्रवादीचे नेते सुधाकर घारे यांनी घेत … Read more

पिंपरी | गायकवाड, साबळे जुगलबंदी आमदार केसरी बैलगाडा शर्यतीचा मानकरी

कार्ला, (वार्ताहर) – छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्यभिषेक दिनाचे औचित्य साधत कार्ला येथे आमदार केसरी बैलगाडा छकडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात आमदार केसरी स्पर्धेचा मानकरी वेहरगाव येथील अमित गायकवाड व करंजगाव येथील सरपंच दत्तात्रय गबळू साबळे या जुगलबंदीच्या बैलगाडीने मिळवला. तर, घाटाचा राजा किताब अमित गायकवाड व तुषार कवडे या जुगलबंदीने मिळवला. या स्पर्धेत … Read more

पिंपरी | महाराजांच्या गुणांचे राज्यकर्त्यांनी अनुकरण करण्याची गरज – ॲड रानवडे

पिंपरी, (प्रतिनिधी) – राज्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा आचार-विचार, सुसंस्कृतपणा, कुशल प्रशासन आणि धर्मनिरपेक्ष राज्यकारभार हे गुण अंगिकरणे गरजेचे आहे. असे मराठा सेवा संघाचे पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष ॲड. लक्ष्मण रानवडे व्यक्त केले. शिवराज्याभिषेक दिनानिमित्त पिंपरी येथील एच. ए. कॉलनी मधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करताना ते बोलत होते. ३९१व्या राज्याभिषेक दिनानिमित्त पिंपरी चिंचवड शहर … Read more

पिंपरी | मावळ तालुक्यातील रस्त्यांची वाट बिकट

मावळ – मावळ तालुक्यातील अनेक रस्त्यांची वाट बिकट झालेली असून ठिकठिकाणी खोदकाम, अर्धवट रस्ते केलेले असल्याने या पावसाळ्यातही ग्रामस्थांना चिखल तुडवावा लागणार आहे. दमदार पावसाला सुरवात होण्यापूर्वी गावांतील रस्त्यांची दुरुस्ती, डागडुजी करण्याची मागणी ग्रामस्थ करत आहेत. मावळ तालुक्यातील अनेक गावांमध्ये अद्यापही चांगले रस्ते नाहीत. अनेक ठिकणी माती, खडी, मुरूम टाकलेले रस्ते आहेत. त्यातूनच ग्रामस्थांना वाट … Read more

पिंपरी | शहरातील सर्व अनधिकृत होर्डिंग भुईसपाट

तळेगाव दाभाडे, (वार्ताहर) – येथील नगरपरिषद हद्दीत असलेले सर्व ३२ अनधिकृत होर्डिंग काढण्याची कार्यवाही पूर्ण झाली असून अनेक चौकातील विद्रुपीकरण करणारे तातपुरत्या स्वरूपात लावलेले अनधिकृत होर्डिंगचे सांगाडे देखील काढण्यात यावेत, अशी मागणी नागरिक करत आहेत. घाटकोपर येथील दुर्घटनेनंतर तळेगाव दाभाडे नगरपरिषद हद्दीत असलेल्या अनधिकृत जाहिरात फलकांची संरचनात्मक लेखापरीक्षण तपासणी करावे. त्यात आढळून आलेल्या अवैध जाहिरात … Read more

पिंपरी | खोपोली शहरात मान्सून पूर्व पावसाची हजेरी

खोपोली , (वार्ताहर) – गेल्या दोन दिवसांपासून खोपोली शहरात ढगाळ वातावरण होते. त्यामुळे उष्णतेमध्ये प्रचंड वाढल्याने नागरिकसुध्दा पावसाच्या प्रतीक्षेत होते. त्याच गुरुवारी (दि. ६) दुपारी विजांच्या कडकडाटात ढगांच्या गडगडाटासह मान्सून पूर्व पावसाची हजेरी लावली. त्यामुळे खोपोली शहर ओलाचिंब झाले तर, परिसरातील शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद पहायला मिळाला. मे महिन्यापासूनच अतीउष्मा वाढल्याने नागरिक चिंतेत होते. पाणी टंचाईची … Read more