पिंपरी : लोकसभा निवडणुकीसाठी ‘नोटा’ पर्यायाचा होतोय प्रचार

पिंपरी – लोकसभा निवडणूक जस-जशी जवळ येत आहे. तेवढ्याच जोमाने राजकीय पक्ष प्रचार करत आहेत. आतापर्यंत कधीही “नोटा’चा प्रचार कोणीच केला नव्हता. मात्र यावेळी पॅनकार्ड क्‍लब कंपनी बंद झाल्याने देशातील 55 लाख गुंतवणुकदारांची आर्थिक कोंडी सोडवण्यात अयशस्वी ठरलेल्या सत्ताधारी सरकार व विरोधीपक्ष प्रतिनिधींना नोटाच्या मार्फत धडा शिकवण्याचा निर्धार राष्ट्रशक्ती को-ऑर्डिनेशन कमिटीच्या वतीने करण्यात आला आहे. … Read more

पिंपरी : लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे सभा तहकुबींवर भर

लोकप्रतिनिधींची महापालिकेकडे पाठ : कर्मचारी प्रशिक्षणासाठी पिंपरी – लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने लोकप्रतिनिधींनी महापालिकेत फिरकणेच बंद केले आहे. केवळ नावापुरतेच विविध सभांचे कामकाज सुरु ठेवले जात आहे. तर बहुतांशी सर्वच समित्यांच्या साप्ताहिक, पाक्षिक व मासिक सभा तहकूब करण्यावर भर दिला जात आहे. त्यामुळे सभा कामकाजाचे काम थंडावल्याचे चित्र आहे. महापालिकेची मार्च महिन्याची सर्वसाधारण सभा … Read more

शिक्षक भरती प्रक्रिया लांबणीवर

शिक्षण विभागातील कर्मचारी निवडणुकांच्या कामात पिंपरी -आचारसंहितापुर्वी शासनाने शिक्षक भरतीची तयारी जोरदार चालविली होती. मात्र अचानकपणे आचासंहिता जाहीर झाल्यानंतर ही प्रक्रिया आता थंडावली आहे. मागील काही दिवसांपासून शिक्षण विभागातील अधिकारी व कर्मचारी निवडणुकीच्या कामात व्यस्त आहेत. त्यामुळे, भरती प्रक्रियेवर परिणाम झाला असून शिक्षक भरती प्रक्रिया लांबणीवर पडणार हे स्पष्ट झाले आहे. राज्य शासनाने मागील काही … Read more

#लोकसभा2019 : ‘पिंपरी-चिंचवड’ शहरातील नेत्यांचे ‘पॅचअप’ होईना; कार्यकर्ते सैरभैर

युतीतील परिस्थिती : भाजपाचे निष्ठावंत मनोमिलनापासून ठेवताहेत स्वत:ला दूर पिंपरी – लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली तरी पिंपरी-चिंचवड शहरातील शिवसेना-भाजप युतीतील तणाव निवळण्याचे नाव घेत नाही. शिवसेनेच्या दोन्ही खासदारांनी भाजप आमदारांसमोर “टाळी’साठी हात पुढे केला. मात्र, आमदारांनी हात आखडताच ठेवला आहे. त्यामुळे प्रचार यंत्रणेतील भाजपचा सहभाग थंडावला आहे. केंद्रात भाजपला पुन्हा सत्ता मिळवून देण्याचे स्वप्न … Read more

तोटा झाल्यास चालक-वाहक जबाबदार; एसटीचे नवे परिपत्रक

 तोट्याचे खापर वाहक-चालकांच्या माथी मारण्याचा प्रयत्न पिंपरी – मागच्या कित्येक वर्षांपासून तोट्यात चालत असलेल्या एस.टी महमंडळाने आता सतत होणारा तोटा कमी करण्यासाठी नामी शक्‍कल काढली आहे. एस.टी महामंडळाला होणाऱ्या तोट्याला चालक-वाहकांना जबाबदार धरुन कारवाई करण्याचे परिपत्रक महामंडळाने काढले आहे. त्यामुळे, तोट्याचे खापर चालक-वाहकांच्या माथी फोडण्याचा प्रयत्न महामंडळाकडून केला जात असल्याने चालक वाहकांमध्ये मोठी नाराजी पसरली … Read more

पिंपरी-चिंचवड महापालिका अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धती विरोधात नाराजी

राष्ट्रीय अनुसूचित जाती आणि जनजाती आयोगाची आयुक्तांना नोटीस पिंपरी- पिंपरी-चिंचवड महापालिका अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धती विरोधात राष्ट्रीय अनुसूचित जाती आणि जनजाती आयोगाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तसेच, कामात हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करुन सात दिवसांत अहवाल सादर करा, असे आदेश पालिका आयुक्तांना राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाने दिले आहेत. तर, राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोगाने तिसऱ्यांदा स्मरणपत्र … Read more

तक्रार घेण्यास टाळाटाळ करणाऱ्या तिघा पोलिस कर्मचाऱ्यांचे निलंबन

पोलीस आयुक्‍त आर.के. पद्मनाभन यांची कारवाई; चिखली पोलीस ठाण्यातील प्रकार पिंपरी -चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीच्या विनयभंगाची तक्रार घेण्यास टाळाटाळ करण्याचा प्रकार चिखलीतील एका पोलीस अधिकाऱ्यासह दोन कर्मचाऱ्यांना चांगलाच महागात पडला. टाळाटाळ केल्याप्रकरणी पोलीस आयुक्त आर. के. पद्‌नाभन यांनी एका सहाय्यक पोलीस निरीक्षकासह दोन पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे तर इतर तिघा जणांची तात्काळ बदली केली … Read more

दुकानाचे शटर उचकटून चोरी

पिंपरी -शटर उचकटून चोरट्यांनी दुकानातील सामान व रोख रक्कम असा 7 हजार 400 रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना चिंचवड येथे नुकतीच उघडकीस आली. या प्रकरणी रवींद्र हनुमंत कुरवडे (वय 35, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी रवींद्र यांचे वाल्हेकरवाडी येथील चिंतामणी … Read more

पिंपरी : किरकोळ कारणावरून एकाला बेदम मारहाण

पिंपरी – रस्ता क्रॉस करीत असताना झालेल्या किरकोळ वादातून चौघांनी मिळून एकाला दगडाने मारहाण केल्याची घटना शनिवारी (दि.30) रोजी दुपारी बाराच्या सुमारास वाकड येथे घडली. या प्रकरणी राहुल बाळासाहेब भुजबळ (वय 34, रा. भुजबळ वस्ती, वाकड) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, चार अनोळखी इसमांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी भुजबळ हे … Read more

पैशाच्या वादातून मावस भावाला जीवे मारण्याचा प्रयत्न

पिंपरी – पैसे न दिल्याच्या कारणावरुन मावस भावावर कोयत्याने वार जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना जुनी सांगवी येथे शनिवारी (दि.30) रात्री साडेबाराच्या सुमारास घडली. या हल्ल्यात राजेश टारझन कुलकर्णी हे गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी त्यांची पत्नी वर्षा राजेश कुलकर्णी (वय 30, रा. शिंदेनगर, जुनी सांगवी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार राजू रघु बंगेरा … Read more