यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या आयआयएमएस यांच्या वतीने जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा

पिंपरी – यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्स (आयआयएमएस) च्या वतीने जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. पर्यावरण दिनाच्या निमित्ताने संस्थेच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले. शाश्वत विकास आणि पर्यावरण संवर्धनासाठी व्यक्ती, संस्था आणि समूह या सर्वांचा सक्रिय सहभाग वाढवा,यासाठी 1972 सालापासून संयुक्त राष्ट्र संघाने 5 जून हा जागतिक पर्यावरण दिन घोषित केला. यानिमित्ताने … Read more

पिंपरी | आचारसंहिता शिथील, विकासकामांचा मार्ग मोकळा

पिंपरी, (प्रतिनिधी) – नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केलेली आचारसंहिता तब्बल तीन महिन्यांनी शिथील करण्यात आली आहे. अर्थात नव्या सरकार स्थापनेनंतर पूर्णत: उठवली जाणार आहे. यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेसह पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, एमआयडीसी आदी आस्थापनांची आचारसंहितेमुळे खोळंबलेली विकासकामे मार्गी लावण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. अठराव्या लोकसभेच्या ५४३ सदस्यांच्या निवडीसाठी … Read more

पिंपरी | पवना शिक्षण संकुलात एक विद्यार्थी, एक वृक्ष उपक्रम

पवनानगर, (वार्ताहर) – जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून एक विद्यार्थी, एक वृक्ष लागवड व संवर्धन या अभिनव उपक्रमाची सुरुवात पवना शिक्षण संकुलात करण्यात आल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. या वेळी संस्थेचे सचिव संतोष खांडगे, संचालक सोनबा गोपाळे, दामोदर शिंदे, महेशभाई शहा, संकुलाचे प्राचार्य भाऊसाहेब आगळमे, पर्यवेक्षिका अर्चना शेडगे आदी उपस्थित होते. संस्थेच्या सर्व शैक्षणिक … Read more

पिंपरी | सोमवारी टोलनाके बंद करणार

तळेगाव दाभाडे, (वार्ताहर) – वाहन क्रमांकावरून स्थानिकांची फसवणूक करून टोल आकारणी केली जात आहे. ती त्वरित थांबवावी. अन्यथा सोमवारी (दि. १०) टोल नाका बंद करण्यात येईल, असा इशारा आमदार सुनील शेळके यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून पत्रकाद्वारे दिला आहे. मावळ तालुक्यामध्ये वर्सोली व सोमाटणे असे दोन टोलनाके आहेत. स्थानिक पातळीवर काम करताना अनेकांना या टोल नाक्यावरून … Read more

पिंपरी | दोनदा नोटीस दिलेल्‍या दोन कंपन्यांना आग

पिंपरी, (प्रतिनिधी) – पिंपरी चिंचवड महापालिकेच्‍या अग्‍निशामक विभागाने दोनदा नोटीस बजावलेल्‍या दोन कंपन्‍यांना आग लागली. ही घटना गुरुवारी (दि. ६) सकाळी पवार वस्‍ती, चिखली येथे घडली वीरभ सस्पेंशन कंपनी आणि आर. के. ट्रेडर्स अशी आग लागलेल्‍या कंपनीचे नाव आहे. वीरभ सस्पेंशन कंपनीचे पाच हजार चौरस फूट तर आर. के. ट्रेडर्स कंपनीचे दोन हजार चौरस फुटांचे … Read more

पिंपरी | दहावी, बारावीनंतर पुढे काय ?

पिंपरी, (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्या वतीने दहावी व बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी पिंपरीतील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात शनिवारी (दि. ८) सकाळी दहा वाजता दहावी व बारावीनंतर काय ? या करिअर मार्गदर्शन विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये एमपीएससी व युपीएससी स्‍पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन करणारे व्‍याख्‍याते अविनाश धर्माध‍िकारी हे दहावी आणि बारावीनंतरचे … Read more

पिंपरी | नालेसफाईच्या कामकाजावर प्रश्‍नचिन्ह

पिंपरी, (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड शहरात मंगळवारी ढगफुटी होऊन आपत्ती निवारणाचा प्रश्‍न निर्माण झाल्याने आयुक्तांनी तातडीने रस्ते, उड्डाणपूल, भुयारी मार्गावरील वाहतुकीला होणारे अडथळे दूर करण्यासाठी त्याठिकाणी जाऊन प्रत्यक्ष पाहणी करावी. उड्डाणपूल, मोठ्या जुन्या इमारती आदी ठिकाणी पक्षांच्या बीज वहनामुळे वाढलेली झाडे-झुडपे तातडीने काढू टाकावीत, पुलावरील पावसाचे पाणी जाण्यासाठी अडसर ठरणारा कचरा काढून स्वच्छता करण्यात यावी. येत्या … Read more

पिंपरी | अन्यथा भाजपचे अस्तित्व संपून जाईल

पिंपरी, (प्रतिनिधी) – सत्ताधारी भाजपभोवती ठेकेदार व कंत्राटदारांचे कोंडाळे जमा झाले होते. त्यामुळे कामगार, श्रमिक व समाज पक्षापासून कधी दुरावला हे पदाधिकार्‍यांना समजलेच नाही. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत राज्यात भाजपला अपेक्षित यश न मिळाले नाही. त्यामुळे आता तरी भाजप पदाधिकार्‍यांनी आपल्या वर्तणुकीत सुधारणा करावी. नाहीतर याची किंमत भाजपला आगामी विधानसभा निवडणुकीत मोजावी लागेल, पक्षाचे अस्तित्व संपून … Read more

पिंपरी | तेलंग हॉटेल व्यवस्थापन महाविद्यालयास नॅकचा बी प्लस श्रेणी

पिंपरी, (प्रतिनिधी) – कॅम्प एज्युकेशन सोसायटीचे डॉ. अरविंद ब. तेलंग इन्स्टिट्युट ऑफ हॉटेल मॅनेजमेंटला विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) राष्ट्रीय मूल्यांकन आणि मानांकन परिषदेने(नॅक) केलेल्या या तपासणी समितीकडून ’बी प्लस ग्रेड’ प्राप्त झाला आहे. नॅककडून 2.64 (सीजीपीए) गुण मिळवत हे यश संपादन केले असल्याची माहिती प्राचार्य डॉ. अजय कुमार राय यांनी दिली. 100 टक्के उत्कृष्ट निकाल, … Read more

पिंपरी | आमदार आण्णा बनसोडे अजित पवारांच्या बैठकीला दांडी

पिंपरी, (प्रतिनिधी) – उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बोलविलेल्या आमदारांच्या बैठकीला पिंपरी विधानसभेचे आमदार आण्णा बनसोडे गैरहजर होते. त्यामुळे ते अजित पवारांची साथ सोडणार का? अशी चर्चा सुरू झाली; मात्र मी वैयक्तिक कारणांमुळे या बैठकीला उपस्थित राहू शकलो नाही. तशी मी वरिष्ठांना कल्पना दिली होती, असे सांगत मी काल अजित पवार यांच्यासोबत होतो आणि उद्याही त्यांच्यासोबतच … Read more