पिंपरी | हभप नितीन महाराज मोरे यांना पिंपरी चिंचवड समाजभूषण पुरस्कार प्रदान

पिंपरी, (प्रतिनिधी) – दिवंगत महापौर कै.भिकू वाघेरे (पाटील) यांच्या 38 व्या पुण्यतिथी निमित्त पिंपरी वाघेरे गाव येथील कै. भिकु वाघेरे – पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पिंपरी चिंचवड महापालिका अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, माजी विरोधी पक्ष नेते नाना काटे व काँग्रेस शहराध्यक्ष कैलास कदम यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. सालाबादप्रमाणे कै.भिकू वाघेरे प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात … Read more

पिंपरी | ईवा असोसिएशनतर्फे गरजू विद्यार्थ्यांना मदतीचा हात

पिंपरी, (प्रतिनिधी) – ईवा एंपावर्ड वुमन्स असोसिएशनतर्फे बोधिसत्व प्रतिष्ठानद्वारा संचालित राजर्षी शाहू महाराज विद्यालयातील २० गरजू विद्यार्थ्यांच्या शुल्कासाठी संस्थेला आर्थिक मदत करण्यात आली. ईवाच्या संचालिका शारदा अग्रवाल, सल्लागार मीनल जाजोदिया, संस्थेचे सचिव कांबळे, प्राचार्य बाबा शिंदे, व्यवस्थापक नेमीचंद अग्रवाल, राहुल अग्रवाल, अशोक अग्रवाल, प्रीती अग्रवाल, शैलेश अग्रवाल आदी उपस्थित होते. शारदा अग्रवाल यांनी सांगितले की, … Read more

पिंपरी | लोणावळा शहरात तीन तासांमध्ये ८० मिलिमीटर पावसाची नोंद

लोणावळा, (वार्ताहर) – लोणावळा शहरामध्ये मंगळवारी (दि. ४) सायंकाळी ढगांचा गडगडाट व विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. अवघ्या तीन तासांमध्ये लोणावळा शहरात ८० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. मंगळवारी सायंकाळी मावळ तालुका व लोणावळा परिसरामध्ये सोसाट्याच्या वारा, वादळ आणि विजांच्या कडकडाटात जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. अवघ्या तीन तासांमध्ये ८० … Read more

पिंपरी | बारणे यांच्या हॅटट्रिकनिमित्त तळेगाव शहर भाजपातर्फे मिठाई वाटप

तळेगाव दाभाडे, (वार्ताहर)- मावळ लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांची तिसऱ्यांदा खासदारपदी विजयी झाल्याबद्दल तळेगाव दाभाडे शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने मिठाई वाटप करून पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह जल्लोष साजरा करण्यात आला. या वेळी मावळ तालुका भाजपा निवडणूक प्रमुख रविंद्र भेगडे, तळेगाव दाभाडे शहर भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष अशोक दाभाडे, माजी सभापती गुलाब म्हाळसकर, माजी … Read more

पिंपरी | तळेगावमध्ये नगरपरिषदेकडून वृक्षारोपण, स्वच्छता मोहीम

तळेगाव दाभाडे, (वार्ताहर) – जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून शहरातील स्टेशन तळे परिसर, जुन्या मुंबई – पुणे महामार्गालगत तळेगाव दाभाडे नगर परिषदेकडून वृक्षारोपण करण्यात आले. या वेळी कार्यक्रमाचे नियोजन उमुख्याधिकारी तथा उद्यान विभाग प्रमुख ममता राठोड आणि उद्यान विभाग सहाय्यक विशाल मिंड यांनी मुख्याधिकारी एन. के. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली केले. या वेळी कर विभाग अधिकारी … Read more

पिंपरी | खांडगे इंग्लिश मीडियम शाळेमध्ये वृक्षारोपण

तळेगाव दाभाडे, (वार्ताहर) – जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्त नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे मामासाहेब खांडगे इंग्लिश मीडियम शाळेमध्ये वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला. या वेळी इयत्ता १० वीचे विद्यार्थी, मुख्याध्यापक यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. सर्व शिक्षक, कर्मचारी वर्ग उपस्थित होते. या वेळी सन २०२४-२५ या वर्षाची थीम ही जमीन पुनर्संचयित करणे, वाळवंटीकरण थांबवणे आणि दुष्काळी … Read more

पिंपरी | मावळ विधानसभेत महायुतीच गणित चुकलं

वडगाव, {किशोर ढोरे} – मावळ विधानसभा क्षेत्रात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) आणि भारतीय जनता पार्टी हे दोन प्रमुख पक्ष आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे परस्पर विरोधी लढले. या लढाईत 93 हजार 942चे मताधिक्य राष्ट्रवादीचे उमेदवार सुनील शेळके हे निवडून आले. मात्र यंदाच्या लोकसभा निवडणुकीत हे दोन्ही पक्ष एकत्र आले. … Read more

Pimpri Crime: तब्‍बल 90 गुन्‍हे असलेल्‍या सराईत गुन्‍हेगारास अटक; निगडी पोलीस ठाणे तपास पथकाची कामगिरी

पिंपरी  – तब्‍बल ९० गुन्हे दाखल असलेल्या कुख्यात घरफोड्यास व चोरीचे दागिने विकत घेणार्‍यास सोनारास निगडी पोलिसांनी अटक केली. त्‍याच्‍याकडून २५ लाख ३ हजार ४५० रुपये किंमतीचा माल जप्त केला. प्राधिकरण निगडी येथील श्रीलक्ष्‍मी ज्‍वेलर्स नावाचे दुकानात चोरी झाल्‍याचे २६ मे रोजी सकाळी उघडकीस आले. चोरट्याने शटर उचकटून आतील ३० तोळे सोन्याचे दागीने, १० किलो … Read more

पिंपरी | मावळ तालुक्याच्या पूर्वपट्याला अवकाळी पावसाने झोडपले

तळेगाव दाभाडे, (वार्ताहर) – अवकाळी पावसाने सायंकाळी मावळ तालुक्याच्या पूर्वपट्याला झोडपून काढले. सुमारे तासभर चाललेल्या या पावसाने सर्वत्र पाणी पाणी झाले. पूर्वेकडून आलेल्या पावसाने तळेगाव, इंदुरी, सोमाटणे फाटा, वडगाव, वरळी, आंबी, नानोली या पट्ट्यात जोरदार हजेरी लावली. काही दिवसांच्या विश्रांतीनंतर अवकाळी पावसाने पुन्हा पूर्वपट्याला जोरदार तडाखा दिला. या पावसाने खरीप भात पीक तसेच सोयाबीन भुईमूग … Read more

पिंपरी | एक टक्के नागरिकांची ‘नोटा‘ला पसंती

पिंपरी, (प्रतिनिधी) – मावळ लोकसभा मतदार संघातील १६ हजार ७६० नागरिकांनी ‘नोटा‘ला पसंती दिली. त्यातील ३१ मते ही पोस्टल मते होती. तर, एकूण मतदारांच्या टक्केवारीमध्ये 1.18 टक्के नागरिकांनी ३३ पैकी आपल्यासाठी एकही उमेदवार योग्य नसल्याचे मत नोंदविले आहे. मावळ लोकसभेसाठी एकूण ३३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे होते. त्यातील मुख्य लढत ही दोन्ही शिवसेनेच्या उमेदवारांमध्ये झाली. … Read more