पत्नीच्या छळाला कंटाळून पतीची न्यायालयात धाव

पुणे – पत्नी लग्नापूर्वी नोकरी करत नसतानाही असल्याची खोटी माहिती देणे, तसेच पतीसह सासरच्या लोकांना शिवीगाळ करणे, त्यांच्या अंगावर मारण्यासाठी धावून जाणे, पतीला मारहाण करणे अशा पत्नीच्या शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून पतीने घटस्फोटासाठी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने समन्स बजावूनही पत्नी न्यायालयात हजर राहिली नाही. तिने न्यायालयात लेखी म्हणणे सादर केले नाही. अथवा बचावात्मक पुरावा … Read more

Pune: कामगारांना बांधून ठेवून २० लाखांचे मोबाईल पळविले

पुणे – टिळक रोडवरील एका मोबाईलच्या स्टोअररूमधील कामगारांना चाकूच्या धाकाने बांधून ठेवत दुकानातील २० लाख ५० हजारांचे मोबाईल चोरून पळालेल्या तिघांना विश्रामबाग पोलिसांनी अटक केली. यातील दोघेजण मुंबईतील असून एकजण चिंचवडमधील आहे. आरोपींकडून पोलिसांनी चोरीचे मोबाईल जप्त केले आहेत. झबीउल्लाह नबीउल्लाह खान (२८, रा. घाटकोपर, मुंबई), सोहेल अय्युब शेख (२०, रा. मुंबई), कमलेश विश्वास मोरे … Read more

ललित पाटील प्रकरण: ससूनच्या उपाहारगृहातील कामगाराचा जामीन फेटाळला

पुणे – ससून रुग्णालयातून अमली पदार्थ विक्री करणारा तस्कर ललित पाटील प्रकरणात मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आलेला रुग्णालयाच्या उपाहारगृहातील कामगार रौफ रहीम शेख याचा जामीन अर्ज विशेष न्यायाधीश व्ही. आर कचरे यांनी फेटाळला. ललित पाटील याचा साथीदार सुभाष मंडल सह रौफ रहीम शेख याला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने ३० सप्टेंबरला अटक केली. पाटीलला रुग्णालयात दोन कोटी … Read more

Baramati News : माळेगाव येथे अवैधरीत्या गर्भलिंग निदान केल्याप्रकरणी डॉक्टरवर गुन्हा दाखल

Baramati News – अवैधरीत्या गर्भलिंग निदान केल्याप्रकरणी एक डॉक्टर व खासगी व्यक्तीवर गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व रोग निदानतंत्रे (लिंगनिवडीस प्रतिबंध) अधिनियमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे,  अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागनाथ यमपल्ले यांनी दिली. डॉ. मधुकर चंद्रकांत शिंदे हे काही दलांलामार्फत चारचाकी गाडीत पोर्टेबल सोनोग्राफी मशीन घेऊन गर्भलिंग निदान करीत असल्याबाबतची तक्रार जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाकडे … Read more

Pune Crime: ई-सिगारेट, तंबाखूचे फ्लेवर विकणारे 21 जण पोलिसांच्या ताब्यात; शहरभर कारवाई

पुणे – तरुणांना टार्गेट करत शहरातील मोठ्या शैक्षणिक संकुल परिसरात कायद्याचे उल्लंघन करत ई सिगारेट, बेव तंबाखुजन्य फ्लेवरची विक्री करणाऱ्यांवर पोलिसांनी कडक कारवाई करत १० लाख ६७ हजार ५९४ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच याप्रकरणी शहरातील विविध भागातून २१ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. देशभरात ई सिगारेट, बेव विक्रीवर केंद्र सरकारने बंदी घातली … Read more

अंडरवर्ल्डशी माझे संबंध… तुझा अजय भोसले करील..; अग्रवाल पिता-पुत्राविरुद्ध कोंढवा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल

पुणे – अंडरवर्डशी माझे डायरेक्ट संबंध आहेत, पोलीस मी खिशात घेऊन फिरतो, तुझा अजय भोसले करीन, त्याला जसा ठोकला तसा तुला ठोकीन, तो वाचला पण तू वाचणार नाही अशी धमकी देत इस्टेट एजंटची १ कोटी ३२ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक अग्रवाल पिता-पुत्रांवर कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे कल्याणीनगर अपघात प्रकरणी … Read more

Pune News : मध्य प्रदेशातील तरुणाकडून सात दुचाकी हस्तगत; खडक पोलिसांची कामगिरी

पुणे – खडक पोलिसांनी संशयावरुन अटक केलेल्या मध्य प्रदेशातील व्यक्तीकडून चोरीच्या सात दुचाकी हस्तगत केल्या. एका वाहन चोरीच्या गुन्हयाचा तपास करताना आरोपी पोलिसांच्या हाती लागला होता. गोवर्धनप्रसाद ललवा साहू (३५ , रा.स.नं.१२० किष्कींदानग, कोथरुड, मुळ जिल्हा-उमरीया, मध्यप्रदेश ) असे अटक आरोपीचे नाव आहे. तो पुण्यात मिक्सर दुरूस्तीचे काम करतो. त्याच्यावर २०१८ मध्ये अलंकार पोलीस ठाण्यात … Read more

Pune Crime: पत्नीने घटस्फोट घेऊन दुसरे लग्न केल्याचा राग; धारदार शस्त्राने वार करत दुसऱ्या पतीचा खून

पुणे – पत्नीने घटस्फोट घेऊन दुसरे लग्न केल्याचा राग मनात धरून पहिल्या पतीने आपल्या साथीदाराला सोबत घेऊन पत्नीच्या दुसर्‍या पतीवर खूनी हल्ला केला. धारधार हत्याराने केलेल्या हल्ल्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. सोनल उर्फ सुमीत पटेकर (रा.पवळे चौक कसबा पेठ) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी, प्राजक्त सोनल उर्फ सुमित पटेकर (वय.34,रा. कसबा पेठ) यांनी … Read more

सुरेंद्र, विशाल अग्रवाल यांच्या अडचणीत वाढ; कन्स्ट्रक्शन व्यावसायिकाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

पुणे – कल्याणीनगर अपघात प्रकरणी चर्चेत आलेल्या सुरेंद्र अग्रवाल आणि बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल या पिता पुत्रासह ५ जणांवर कन्स्ट्रक्शन व्यावसायिकाला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे अग्रवाल पिता पुत्राच्या अडचणीत आणखी वाढ झाल्याचे सांगितलं जात आहे. सावकारी कर्जाला कंटाळून वडगाव शेरी येथे राहणाऱ्या ४१ वर्षीय कन्स्ट्रक्शन व्यवसायिकाने … Read more

Bribe News: 4 हजार रुपयांची लाच घेताना कृषी पर्यवेक्षकाला रंगेहाथ पकडले; जुन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पुणे- लॉटरी पद्धतीने शासकीय अनुदानामध्ये मंजूर झालेल्या ट्रॅक्टरचे अनुदान मंजूर करण्यासाठी चार हजार रुपये लाच घेताना जुन्नर तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील कृषी पर्यवेक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. त्याच्यावर जुन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बापु एकनाथ रोकडे (५७) असे लाच घेताना पकडलेल्या कृषी पर्यवेक्षकाचे नाव आहे. याबाबत ५२ वर्षीय व्यक्तीने पुणे … Read more