खासदार निलेश लंके यांच्या समर्थकावर प्राणघातक हल्ला; रुग्णालयात उपचार सुरू

Ahmednagar : अहमदनगर लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काॅंग्रेस शरद पवार पक्षाचे निलेश लंके यांचा विजय झाला आहे. निकालाच्या दोन दिवसानंतर आज पारनेरमध्ये लंके यांच्या समर्थकावर प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आहे. राहुल झावरे असे लंके यांच्या समर्थकाचे नाव असून हल्लेखोरांनी झावरे यांच्या कारवर हल्ला केला. कारच्या काचा फोडून त्यांना मारहाण करण्यात आली आहे. या मारहाणीत … Read more

Smuggling gold: दुबईहून पुण्यात सोन्याची तस्करी; पुणे विमानतळावर एक किलो सोने जप्त

पुणे –  पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर तब्बल एक किलो सोने (१०८८.३ ग्रॅम) जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई बुधवारी करण्यात आली. दुबईमधून आलेल्या एका प्रवाशाने त्याच्या सीटखालील पाईपमध्ये सोने लपवले होते. कस्टम विभागाला याची माहिती मिळाल्यावर अगोदर प्रवाशाची झाडाझडती घेण्यात आली. त्याच्याकडे काहीच मिळाले नाही. मात्र त्याची हालचाल संशयास्पद वाटल्याने तो बसलेले सीट तपासण्यात आले. तेव्हा … Read more

Bribe News: समाजकल्याण अधिकारी डाॅ. सपना घोळवे यांना 1 लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले

सातारा – सांगली जिल्ह्यातील एका निवासी शाळेकरिता मंजूर करण्यात आलेल्या अनुदानाच्या दहा टक्के म्हणजे ६ लाखांची मागणी करून १ लाखाची लाच घेताना सातारा येथील जिल्हा समाजकल्याण अधिकारी तथा सांगलीतील इतर मागास बहुजन कल्याण विभागातील प्रभारी सहायक संचालक डॉ.सपना सुखदेव घोळवे (Dr. Sapna Gholve) (वय 40) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले आहे. दरम्यान, याच … Read more

Pimpri Crime: तब्‍बल 90 गुन्‍हे असलेल्‍या सराईत गुन्‍हेगारास अटक; निगडी पोलीस ठाणे तपास पथकाची कामगिरी

पिंपरी  – तब्‍बल ९० गुन्हे दाखल असलेल्या कुख्यात घरफोड्यास व चोरीचे दागिने विकत घेणार्‍यास सोनारास निगडी पोलिसांनी अटक केली. त्‍याच्‍याकडून २५ लाख ३ हजार ४५० रुपये किंमतीचा माल जप्त केला. प्राधिकरण निगडी येथील श्रीलक्ष्‍मी ज्‍वेलर्स नावाचे दुकानात चोरी झाल्‍याचे २६ मे रोजी सकाळी उघडकीस आले. चोरट्याने शटर उचकटून आतील ३० तोळे सोन्याचे दागीने, १० किलो … Read more

Pune Crime: येरवड्यातील तारकेश्वर मंदिरात चोरी; दानपेट्या फोडून 2 लाखांची रोकड लंपास

पुणे- येरवड्यातील श्री तारकेश्वर मंदिरातील दानपेट्या फोडून चोरट्यांनी दोन लाखांची रोकड चोरून नेल्याची घटना उघडकीस आली. मंदिराचे विश्वस्त सुधीर वसंतराव वांबुरे (वय ६७, रा. येरवडा गाव) यांनी याबाबत येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. येरवडा गावातील टेकडीवर श्री तारकेश्वर मंदिर आहे. मंदिराच्या मुख्य दरवाज्याचे कुलुप तोडून चोरटा आत शिरला. मंदिरात ठेवलेल्या सहा दानपेट्या फोडून चोरट्याने … Read more

महाराष्ट्रातील “रेशन धान्याचा’ मोठा भ्रष्टाचार उघडकीस; 4 कोटीची मालमत्ता जप्त

नवी दिल्ली  – सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील धान्याच्या भ्रष्टाचार प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने इंडिया मेगा ॲग्रो अनाज लि. कंपनीवर कारवाई केली असून या कंपनीचे मालक अजय बाहेती यांच्या हिंगोली, यवतमाळ आणि नांदेड जिल्ह्यांतील एकूण ४ कोटी ६ लाख रूपयांची मालमत्ता जप्त केली आहे. जप्त मालमत्तांमध्ये बाहेती आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी विकत घेतलेल्या स्थावर मालमत्तांचा समावेश आहे. अन्न … Read more

पोर्शे अपघात प्रकरण: कारमध्ये खरंच तांत्रिक बिघाड होता का? कंपनीने पुणे पोलिसांकडे सादर केला अहवाल

 Porsche car report – कल्याणीनगर येथील अपघात प्रकरणानंतर दररोज यात नवनवीन खुलासे होत आहेत. अपघाताच्या घटनेनंतर आरोपींच्या वकिलांनी न्यायालयात या स्पोर्ट्स कारमध्ये तांत्रिक बिघाड असल्याचे सांगितले होते. त्यानंतर संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांनी पुण्यात येत या कारची पाहणी केली होती. तसेच, कारमधील डेटा तपासासाठी घेऊन गेले होते. पोर्शे कंपनीने नुकताच पुणे पोलिसांना यासंदर्भातील अहवाल सादर केला. त्यात … Read more

Crime News : अनैतिक संबंधातून भाच्याने केला मामीचा खून; स्प्रे मुळे सापडला आरोपी

मुंबई – नालासोपाऱ्यात सापडलेल्या अज्ञात महिलेच्या हत्येचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. या महिलेच्या अंगावर धारदार शस्त्राने वार केले होते. अनैतिक संबंधातून या महिलेची हत्या झाल्याचे उघड झाले आहे. अनैतिक संबंधातून भाच्याने मामीची हत्या केल्याचे धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आहे. दरम्यान, मतदार यादी आणि घटनास्थळावरुन भेटलेल्या स्प्रेवरुन या हत्येचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले … Read more

मालेगाव पुन्हा हादरले ! माजी नगरसेवकावर हल्ला… हाताची बोटे कापली, मुलाच्या पाठीवरही केले वार

मालेगाव : मालेगावात माजी महापौर अब्दुल मलिक युनूस इसा यांच्यावर गोळीबार झाल्याची घटना ताजी असतानाच माजी नगरसेवक अझीझ लल्लू व त्यांच्या मुलावर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. यामध्ये त्यांच्या डोक्याला आणि चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली आहे. इतकेच नव्हे तर त्यांच्या हाताची बोटेही कापण्यात आली आहेत. दरम्यान अझीझ लल्लू व त्यांचा मुलगा मशि‍दीतून नमाज पाठणानंतर बाहेर … Read more

माळशेज ऍग्रो टुरिझम फार्म रिसॉर्टमधील अश्लील नृत्याच्या कार्यक्रमावर पोलिसांचा छापा; मॅनेजरसह 17 तरुण, 11 तरुणी पोलिसांच्या ताब्यात

Pune Rural Police raid – पुणे ग्रामीण पोलिसांनी ओतूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील डिंगोरे गावच्या परिसरातील माळशेज ऍग्रो टुरिझम व फार्म या रिसॉर्टमध्ये सुरु असलेल्या अश्लील नृत्यांच्या कार्यक्रमावर छापा टाकला आहे. या कारवाईत रिसाॅर्ट मॅनेजरसह 17 तरुण आणि 11 तरुणींना ताब्यात घेण्यात आले आहे. ओतूर पोलीसात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवार दिनांक … Read more