केसनंद येथे महिलांचा सन्मान करून महिला दिन साजरा

वाघोली – केसनंद तालुका हवेली येथे  जय महाराष्ट्र महिला बचत गटाचा अध्यक्षा अलकाताई सोनवणे, सदस्य सुनंदा ढवळे यांनी महिलांना साडी-चोळी देऊन महिलांचा सन्मान करून जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा केला.

महिलांचे  समाजातील स्थान आणि भूमिका खूप मोठी आहे महिलांनी एकत्रित येऊन विविध सामाजिक उपक्रम राबवून  जनजागृती करावी असे मार्गदर्शन शिवसेनेच्या नेत्या अलकाताई सोनवणे यांनी केले. जय महाराष्ट्र महिला बचत गटाच्या सर्व महिलांनी  1 मुलगी व 2 मुली असणार्या सर्व माता पालकांना  सत्कार करून  सन्माननीत  करण्यात आले.

यावेळी जय महाराष्ट्र महिला बचत गटाचे सदस्य  संध्या वाव्हळ, सुनंदा ढवळे, मनिषा गायकवाड, रूपाली लक्का, राणी कोकरे, रुपाली  जाधव, हर्षदा गायकवाड, सीमा गायकवाड, प्रिया मोरे,अर्चना बेलकर, अनुराधा धनगुळवार, उषा गायकवाड, गौरी गायकवाड, अजंना जाधव, पुष्पा गायकवाड,या  महिलांना  सन्मानीत करण्यात आले.

Leave a Comment