nagar | छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन साजरा

टाकळीभान, (वार्ताहर) – श्रीरामपूर तालक्यातील टाकळीभान येथे अखंड महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्यभिषेक दिन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

टाकळीभान सोसायटीच्या कार्यालयामध्ये चेअरमन एकनाथ पटारे व व्हाईस चेअरमन रोहिदास बोडखे यांच्याहस्ते तर टाकळीभान ग्रामपंचायत कार्यालयाच्या प्रांगणात विविध मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले.

यावेळी अशोक कारखान्याचे माजी अध्यक्ष ज्ञानदेव साळुंके, माजी उपाध्यक्ष दत्तात्रय नाईक, अशोकचे संचालक शिवाजी शिंदे, यशवंत रणनवरे, काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष राजेंद्र कोकणे, बापूराव त्रिभूवन, प्रा. कार्लस साठे, प्रा. जयकर मगर, सुनिल बोडखे, बापूसाहेब शिंदे,

अनिल बोडखे, आप्पासाहेब रणनवरे, दादासाहेब कापसे, मधुकर गायकवाड, सुनिल रणनवरे तर सोसायटीमध्ये संचालक अविनाश लोखंडे, माजी सरपंच भाऊसाहेब मगर, भाऊसाहेब पवार, दीपक डुकरे, विक्रम मगर, सचिव रामनाथ ब्राम्हणे, रवि शिरसाठ, रघुनाथ शेळके उपस्थित होते.