लोकसभा निवडणुकीपूर्वी तेलगू देसम पक्षाला मोठा धक्का ; ‘या’ घोटाळ्यात चंद्रबाबू नायडू मुख्य आरोपी

Chandrababu Naidu। आंध्र प्रदेशमधील राजकारणात खळबळ उडवणारी बातमी समोर आली आहे. राज्यचे माजी मुख्यमंत्री आणि तेलगू देसमचे प्रमुख चंद्राबाबू नायडू यांच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यांना ११४ कोटीच्या एपी फायबरनेट घोटाळ्यात सीआयडीने प्रमुख आरोपी केले आहे.  गुन्हे अन्वेषण विभागाने विजयवाडाच्या एसीबी न्यायालयात एपी फायबरनेट घोटाळ्याबाबत आरोपपत्र दाखल केले.ज्यात नायडूंचा उल्लेख मुख्य आरोपी म्हणून आहे.

आगामी लोकसभा निवडणुकांसाठी भाजप आणि तेलगू देसम पक्ष एकत्र निवडणुका लढण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र त्या अगोदर चंद्रबाबू नायडू यांचा मुख्य आरोपी म्हणून उल्लेख केल्याने पक्षाला मोठा धक्का बसला आहे. नायडू यांच्यासह हैदराबादमधील नेट इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक व्ही हरी कृष्णा प्रसाद यांचेदेखील नाव सीबीआयने आपल्या आरोपपत्रात दाखल केले आहे.

टीडीपीच्या काळात घोटाळा Chandrababu Naidu।
एकूण ३३० कोटी रुपयांच्या एपी फायबरनेट प्रकल्पात सोईच्या कंपन्यांना टेंडर मिळावे.यासाठी  म्हणून निविदा प्रक्रिया नियमानुसार पार पाडली नसल्याचा नायडू तसेच व्ही हरी कृष्णा प्रसाद यांच्यावर आरोप आहे. २०१४-२०१९ या काळात टीडीपी पार्टीची सत्ता असताना हा घोटाळा झाल्याचा दावा केला जातो.

हेहीवाचा 
‘कौशल्य विकास घोटाळा’ नेमका आहे तरी काय ? अन् चंद्राबाबू नायडू कसे बनले ‘आरोपी क्रमांक १’; वाचा सविस्तर

गुन्हे अन्वेषण विभागाने दाखल केलेल्या आरोपपत्रानुसार वस्तूच्या किमतींचे बाजारात सर्वेक्षण झालेले नव्हते. तसेच कायदेशीर प्रक्रियाही पार पाडण्यात आली नव्हती. असे असताना चंद्राबाबू नायडू यांनी फायबरनेट प्रकल्पाच्या अंदाजित रकमेला मंजुरी दिली. तसेच हरी कृष्णा प्रसाद यांची निविदा मुल्यमापन समितीवर निवड व्हावी यासाठी नायडू यांनी वेगवेगळ्या शासकीय अधिकाऱ्यांवर दबाव टाकला.

टेरासॉफ्टवेअर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला ब्लॅकलिस्टमधून बाहेर काढण्यात आले. त्यानंतर याच कंपनीला निविदा देण्यात आली, असाही आरोप नायडू यांच्यावर आहे. दरम्यान, लोकसभेची निवडणूक काही दिवसांवर आलेली असताना नायडू यांच्यावर अशा प्रकारचा आरोप झाल्यामुळे आंध्र प्रदेशच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे नायडू यावर काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.