चंद्रावरून खुपच सुंदर दिसते पृथ्वी; चांद्रयानने पाठवले चंद्राचे आणि पृथ्वीचे नवीन फोटो

14 जुलै 2023 रोजी चांद्रयान-3 ने GSLV-Mk3 रॉकेटमधून उड्डाण केले होते. चांद्रयान-३ अवकाशात पोहोचल्यावर त्याच्या लँडरवर बसवलेल्या लँडर इमेजर (LI) कॅमेराने पृथ्वीचे छायाचित्र घेतली आहेत. निळ्या पृथ्वीवर पांढऱ्या ढगांची चादर दिसत आहे. कालच चांद्रयान-३ने विचारले होते की अजून फोटो पाठवायचे का? यानंतर, 5 ऑगस्ट रोजी, जेव्हा चांद्रयान-3 चंद्राच्या कक्षेत गेले तेव्हा त्याच्या लँडरचा दुसरा कॅमेरा म्हणजेच लँडर हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी कॅमेरा (LHVC) ने चंद्राच्या पृष्ठभागाचे छायाचित्र घेतले आहेत.

Earth Image By Chandrayaan-3

LHVC हे इलेक्ट्रो-ऑप्टिक्स सिस्टम्स (LEOS), बेंगळुरूच्या प्रयोगशाळेने तयार केले आहे. LHVC प्रत्यक्षात लँडरच्या खालच्या भागात बसवले आहे. तो जमिनीचा फोटो काढतो.

चांद्रयान-3 सध्या चंद्राच्या तिसऱ्या कक्षेत फिरतंय –

सध्या चांद्रयान-३ चंद्राच्या तिसऱ्या कक्षेत फिरत आहे. त्याची कक्षा १७४ किमी x १४३७ किमी आहे. 5 ऑगस्ट 2023 रोजी, जेव्हा चांद्रयान-3 चंद्राच्या पहिल्या कक्षेत पोहोचले. त्यानंतर त्याने चंद्राची पहिली छायाचित्रे प्रसिद्ध केली. त्यानंतर चांद्रयान-3 164 x 18074 किलोमीटरच्या लंबवर्तुळाकार कक्षेत 1900 किलोमीटर प्रति सेकंद या वेगाने चंद्राभोवती फिरत होते. जी गती नंतर 6 ऑगस्ट रोजी 170 x 4313 किमीच्या कक्षेत कमी करण्यात आली.

Moon Image By Chandrayaan-3

अजून किती प्रवास बाकी आहे?

-14 ऑगस्ट 2023: पावणे बारा ते 12:04 पर्यंत चौथी कक्षा बदलली जाईल.
-16 ऑगस्ट 2023: सकाळी 8:38 ते 8:39 दरम्यान, पाचवी कक्षा बदलली जाईल.
-17 ऑगस्ट: चांद्रयान-3 चे प्रोपल्शन आणि लँडर मॉड्यूल वेगळे होतील. त्याच दिवशी, दोन्ही मॉड्यूल चंद्राभोवती 100 किमी x 100 किमीच्या वर्तुळाकार कक्षेत असतील.
-18 ऑगस्ट 2023: लँडर मॉड्यूलचे डीऑर्बिटिंग दुपारी 3.45 ते 4.00 दरम्यान होईल. म्हणजेच त्याच्या कक्षेची उंची कमी होईल.
-20 ऑगस्ट 2023: चांद्रयान-3 चे लँडर मॉड्यूल रात्री पावणे दोन वाजता डि-ऑर्बिटिंग करेल.
-23 ऑगस्ट 2023: लँडर चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ उतरेल. जर सर्व काही ठीक झाले तर लँडर साडेसहा वाजता चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल.

Chandrayaan-3 in Moon Third Orbit

हे कॅमेरे चंद्रावरील खड्ड्यांपासून वाचवतील –

चंद्रावर सुमारे 14 लाख खड्डे आहेत. 9137 पेक्षा जास्त खड्डे ओळखण्यात आले आहेत. 1675 चे वय देखील निश्चित केले गेले आहे. मात्र हजारो खड्डे आहेत. जे मानवाला बघताही आलेले नाही. कारण त्याची अंधारातील बाजू पाहणे अवघड आहे. असे नाही की चंद्राच्या पृष्ठभागावरील खड्डे हे केवळ आघात करणारे खड्डे आहेत. लाखो वर्षांपूर्वी काही ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे देखील तयार झालेले आहेत. पृष्ठभागावर उतरताना, LI आणि LHVC हे कॅमेरे खड्डे आणि खडकावर आपटण्यापासून किंवा पडण्यापासून लँडरचे संरक्षण करतील. त्यांच्या छायाचित्रांच्या आधारे चांद्रयान-३ चे लँडर पृष्ठभागावर उतरणार आहे.