Chandrayaan 3 : ‘चांद्रयान-3’चे प्रक्षेपण 13 जुलै रोजी दुपारी 2:30 वाजता होणार; ‘इस्रो’ची माहिती…

नवी दिल्ली – “चांद्रयान-3’चे प्रक्षेपण 13 जुलै रोजी दुपारी 2:30 वाजता होणार असल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी बुधवारी दिली. श्रीहरिकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटरमधून चांद्रयान-3 लॉंच व्हेईकल मार्क-III ने प्रक्षेपित केले जाईल.

“चांद्रयान-3′ ही भारतीय अंतराळ संशोधन संस्थेची (इस्रो) नियोजित तिसरी चंद्र शोध मोहीम आहे. यात चांद्रयान-2 प्रमाणेच लॅंडर आणि रोव्हर असेल, परंतु ऑर्बिटर नसेल. चंद्राच्या पृष्ठभागावर सुरक्षित लॅंडिंग आणि फिरण्यामध्ये एंड-टू-एंड क्षमता प्रदर्शित करण्यासाठी हे “चांद्रयान-2’चा पुढील टप्पा आहे.

प्रोपल्शन मॉड्यूल 100 किमी चंद्राच्या कक्षेपर्यंत लॅंडर आणि रोव्हर कॉन्फिगरेशन घेऊन जाईल. चंद्राच्या कक्षेतून पृथ्वीच्या वर्णक्रमीय आणि ध्रुवीय मोजमापांचा अभ्यास करण्यासाठी यामध्ये हॅबिटेबल प्लॅनेट अर्थ पेलोडची स्पेक्‍ट्रो-पोलारिमेट्री आहे.