स्वारगेट, हांडेवाडी विभागांतर्गत वाहतुकीत बदल

 

पुणे – स्वारगेट आणि हांडेवाडी विभागांतर्गत वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. याबाबत वाहतूक शाखेचे उपायुक्त राहुल श्रीरामे यांनी आदेश दिले.

स्वारगेट वाहतूक विभागांतर्गत आंबेडकर चौकाकडून व्होल्गा चौकाकडे जाताना हुंडेकरी वॉशिंग सेंटर समोरील किस्मत दुकानापासून (नाल्यापासून) दक्षिणेकडील बाजूस पुढे व्होल्गा चौकाकडे 200 मीटरपर्यंत एका बाजूस दुचाकी आणि चारचाकी पार्किंग करण्यात येत आहे.

तर हांडेवाडी वाहतूक विभागांतर्गत सय्यदनगर रेल्वे गेट ते हांडेवाडी चौक आणि सय्यदनगर रेल्वे गेट ते उंड्री चौक या दोन्ही रोडवर सकाळी 6 ते दुपारी 1 आणि सायंकाळी 5 ते रात्री 10 वाजेपर्यंत या रहदारीच्या वेळेत जड वाहनांना बंदी केली आहे.

Leave a Comment