मराठा आरक्षणाबद्दल छगन भुजबळ म्हणतात, ‘वेगळे आरक्षण दिलंय….’

Chhagan Bhujbal – राज्यात कुणबीकरण सुरु आहे. खोटी प्रमाणपत्र दिली जात आहेत. मराठा समाजाला आरक्षण द्यायला विरोध नाही. तर कुणबी करणाला आमचा सक्त विरोध आहे.

मनोज जरांगे वेगळे आरक्षण दिल्यानंतरही ते ओबीसीतून आरक्षण द्या असे म्हणतात, त्याला आमचा सक्त विरोध आहे. आता त्यांनी दुसऱ्यांच्या आरक्षणात येऊ नये, असा हल्लाबोल मंत्री छगन भुजबळ यांनी केला. । Chhagan Bhujbal

भुजबळ पुढे म्हणाले की, बऱ्याच महिन्यांपासून मराठा समाज आरक्षणासाठी आंदोलने करत आहेत. आधी जे मोर्चे झाले त्यावेळी शांततेत मोर्चे झाले. मात्र यावेळी ओबीसी समाजाला टार्गेट करण्यात आले. ओबीसींना ज्या पोलिसांनी दवाखान्यात नेण्यात आले.

त्यावेळी त्यांच्यावर दगडफेक झाली. आमची इतकीच मागणी होती की, कोणत्याही परिस्थितीत ओबीसीतून मराठा आरक्षण नको, असे त्यांनी म्हटले. देवेंद्र फडणवीस यांनी जे आरक्षण दिले ते सुप्रीम कोर्टात नामंजूर करण्यात आले.

ते का करण्यात आले याचा अभ्यास करण्यासाठी कमिटी स्थापन करण्यात आली. शुर्क्रे यांच्या अध्यक्षतेखाली अडीच कोटी घरांचा सर्वे करण्यात आला. आज कॅबिनेट समोर आणि विधीमंडळात बिल मांडण्यात आले आणि १० टक्के आरक्षण देण्यात आले. आम्ही विरोध करायचा विषय नव्हता. कारण १० टक्के हे वेगळे आरक्षण देण्यात आले आहे, असेही भुजबळ म्हणाले.

हाताने खोडून मराठा कुणबी लिहिले जातेय । Chhagan Bhujbal
जे मागासवर्गीय आहेत त्यांना देखील कुणबी प्रमाणपत्र वाटप करण्यात आले आहे. वंजारी समाजाच्या व्यक्तीला देखील कुणबी प्रमाणपत्र देण्यात आले आहे. हाताने खोडून दाखल्यावर मराठा कुणबी लिहिले जात आहे. काहींना मराठी कुणबी असे देखील प्रमाणपत्र देण्यात आली आहे.

एकाच दाखल्यावर मराठा म्हणून प्रमाणपत्र आहे आणि दुसरीकडे कुणबी असा ही उल्लेख करण्यात आला आहे. सगेसोयरे आले पाहिजेत, अशी मागणी जरांगे यांनी केली आहे, या मागणीला आमचा विरोध असल्याचेही भुजबळांनी म्हटले आहे.