छगन भुजबळ होम क्वारंटाइन

मुंबई – राज्यात करोनाचा कहर सुरूच असून राज्यातील नेत्यांनाही करोनाचा संसर्ग होत असल्याचे दिसून येत आहे. आता राज्याच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी यांना करोनाची लक्षणे जाणवत असल्याने सुरक्षितेच्या दृष्टीने सर्वांची करोना चाचणी करण्यात आली.

यामध्ये सहा अधिकारी व कर्मचारी पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यानंतर मंत्री छगन भुजबळ हेदेखील होम क्वारंटाइन झाले आहेत.

कर्मचाऱ्यांची चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई येथील कार्यालय एक आठवडा बंद ठेवण्याचा निर्णय अन्न, नागरी पुरवठा विभागाकडून घेण्यात आला आहे. कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी पॉझिटिव्ह आढळून आल्याने छगन भुजबळ हे स्वतः होम क्वारंटाइन झाले आहेत.

दरम्यान, कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांनी लक्षणे आढळल्यास करोना तपासणी करून घ्यावी, असे आवाहन छगन भुजबळ यांनी केले आहे.

Leave a Comment