छगन भुजबळ नाराज? भेटीनंतर गिरीश महाजन यांनी दिले स्पष्टीकरण…

Girish Mahajan Meet Chhagan Bhujbal|  लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात महाराष्ट्रातील एकूण 13 मतदार संघात मतदान पार पडणार आहे. यात दिंडोरी आणि नाशिक मतदार संघाचा देखील सहभाग आहे. पण येथे महायुतीतील काही पक्षांचे नेते सक्रिय नाही, अशा तक्रारी करण्यात येत आहे. यातच आता नाशिकमधून लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक असलेले छगन भुजबळ नाराज असल्याची चर्चा रंगली आहे. यादरम्यान शुक्रवारी भाजप नेते गिरीश महाजन यांनी भुजबळांची भेट घेऊन चर्चा केली. त्यानंतर गिरीश महाजन यांनी माध्यमांशी संवाद साधला.

भुजबळांच्या नाराजीच्या चर्चा निरर्थक  – गिरीश महाजन  Girish Mahajan Meet Chhagan Bhujbal|

गिरीश महाजन म्हणाले की, “प्रचाराला शेवटचे काही दिवस बाकी राहिलेत. त्या पार्श्वभूमीवर भुजबळांची भेट घेतली. आता कुठली नाराजी ? मोदींच्या सभेत भुजबळांनी जोरदार भाषण केलं. त्यांच्या भाषणाचे सर्वांनी कौतुक केले. मोदीजींनी कशासाठी पंतप्रधान करायचे आहे. हे त्यांनी सांगितले. त्यामुळे भुजबळांच्या नाराजीच्या चर्चा निरर्थक आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.

याशिवाय महाजन यांच्या आधी राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांनी गुरुवारी 16 मे रोजी पक्षाचे आमदार आणि पदाधिकाऱ्यांची चर्चा करत प्रचारात सक्रिय होण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानंतर त्यांनी छगन भुजबळ यांच्या निवासस्थानी भुजबळांशी चर्चा केली होती.

सुनील तटकरे यांनी शरद पवार यांची भेट घेतली, तसेच ते शरद पवार गटात येणार असल्याचा दावा अनिल देशमुख यांनी केला. यावर गिरीश महाजन म्हणाले की, “अनिल देशमुख तरी तिथे स्थिरस्थावर आहेत का? तुम्ही तिकडे राहा नाहीतर अजून काही वेगळे विचार तुमच्या मनात येतील. सुनील तटकरेंची चिंता तुम्ही करू नका,” असा टोला त्यांनी यावेळी अनिल देशमुखांना लगावला.

भुजब‌ळांचा अनिल देशमुख यांना टोला  Girish Mahajan Meet Chhagan Bhujbal|

भुजब‌ळांनी देखील याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. “माझं कोणाशी बोलण झालं नाही, असे तटकरे यांनी मला सांगितले आहे. तुम्ही तुमचं सांभाळा. तुमचे लोक इकडे येणार नाही ते पाहा. त्यांच्यासाठी डिपार्टमेंट राखून ठेवले आहेत,” असा टोला छगन भुजबळांनी अनिल देशमुखांना लगावला.

हेही वाचा: 

शरद पवार यांचा इशारा,’एवढंच सांगतो हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून बाजूला केल्याशिवाय राहणार नाही’