“देशाच्या विकासासाठी काँग्रेसचे योगदान विसरता येणार नाही..”; छत्रपती शाहु महाराजांची भाजपवर खोचक टीका

Chhatrapati Shahu Maharaj | Lok Sabha Election 2024 – आपण राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्यापासून समाज कार्याची प्रेरणा घेतली आहे, त्यामुळेच कॉंग्रेस पक्षच आपल्यासाठी नैसर्गिक पर्याय होता, त्यामुळेच आपण कॉंग्रेसची उमेदवारी घेतली असे प्रतिपादन कोल्हापुरचे श्रीमंत छत्रपती शाहु महाराज यांनी केले आहे.

एका मुलाखतीत ते बोलत होते, कोल्हापुर मतदार संघात त्यांची लढाई महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांच्याशी होत आहे. ते म्हणाले की यंदा मी प्रथमच निवडणूकीच्या रिंगणात उतरलो असलो तरी मी प्रथमपासूनच राजकीय परिघात राहिलो आहे असे ते म्हणाले.

काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढविण्याबाबत बोलताना ते म्हणाले, हा देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष आहे आणि स्वातंत्र्य चळवळीशी निगडीत असलेला संपूर्ण भारतात अस्तित्व असलेला पक्ष आहे. । Chhatrapati Shahu Maharaj | Lok Sabha Election 2024

आज भारतीय संविधान आणि लोकशाही धोक्यात आली आहे असे प्रत्येकाला वाटते आहे, त्यामुळे देश आणि संविधान वाचवण्यासाठीच आपण हा लढा देत आहोत असे ते म्हणालेे. महाराष्ट्रात अनेक वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या नसल्याने धोक्याची घंटा वाजत आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

महाराष्ट्रातील कोल्हापूर राजघराण्याच्या महत्त्वाबाबत ते म्हणाले की, तेथील सदस्यांनी लोकांच्या हितासाठी समर्पित असले पाहिजे आणि त्यांच्या कल्याणासाठी काम केले पाहिजे अशीच आमच्या घराण्याची पहिल्यापासूनची धारणश आहे. । । Chhatrapati Shahu Maharaj | Lok Sabha Election 2024

आपले द्रष्टे पणजोबा राजर्षी शाहू महाराज यांच्यामुळेच कोल्हापूरची भरभराट झाली, असे त्यांनी नमूद केले. राजर्षी शाहु महाराज एक प्रतिष्ठित समाजसुधारक होते आणि सर्वसमावेशक विकासासाठी उभे होते.

त्यांनी कधीही लोकांच्या ध्रुवीकरणाला प्रोत्साहन दिले नाही. त्यांनी सामाजिक-आर्थिक उन्नतीसाठी काम केले आणि मी त्यांच्यापासून प्रेरणा घेतो,असे शाहू छत्रपती म्हणाले. स्वातंत्र्यानंतरच्या सहा दशकांहून अधिक काळ काँग्रेसचे योगदान, मग ते आर्थिक विकास असो किंवा अणुऊर्जेचा विकास असो, नाकारता येणार नाही, असे ते म्हणाले.

कॉंंग्रेसने देशाच्या विकासासाठी काहीही केलेले नाही हा भाजपचा दावा आपल्याला मान्य नाही, खरे तर भाजपनेच दिलेले एकही आश्वासन पूर्ण केले नाही, असा दावा शाहू छत्रपती यांनी केला. ।  Chhatrapati Shahu Maharaj | Lok Sabha Election 2024