#coronavirus : कोविड रुग्णालयात अग्नीतांडव; 5 जणांचा दुर्दैवी मृत्यू

नवी दिल्ली  -देश सध्या कोरोनाचा तांडव सुरू आहे. अनेक राज्यांमध्ये  करोना रुग्ण संख्या दुप्पटीने वाढत आहे.  केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ हर्ष वर्धन यांनी आज देशातल्या कोविड रुग्णसंख्या वाढत असलेल्या 11 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील प्रतिनिधींसोबत एक उच्चस्तरीय बैठक घेतली.  याचदरम्यान छत्तीसगड येथील रायपुरच्या पचपेडी नाक्यावर राजधानी रुग्णालयात भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रुग्णालयात कोविड रुग्णांवर उपचार सुरु असतांना शॉर्ट सर्किटमुळे आयसीयू वार्डमध्ये  मोठ्या प्रमाणात धूर निर्माण होऊन आग लागली. यावेळी खिडकी तोडून धूर बाहेर काढण्यात आला आणि आगीवर नियंत्रण आणण्यात आलं.

या आगीत पाच रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर आग लागली त्यावेळेस जवळपास 50 रुग्ण रुग्णालयात उपचार घेत असल्याची माहिती मिळत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासन तातडीने घटनास्थळी दाखल झाले. तसेच अग्निशमन दलाच्या जवानांनी केलेल्या शर्थीच्या प्रयत्नांमुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे.

Leave a Comment